गडचांदूर:-
गडचांदूर जवळील नोकारी,गोवारीगुडा,लिंगनडोह, कुसुंबी मार्गावरील माणिकगड माईन्स येथे बांधलेला रपटा जीवघेणा ठरला असून पावसाळ्यात या रापट्यावरून ये-जा करणे मोठे जीकरीचे बनले आहे. काही दिवसापुर्वी यावरून एक तरूण वाहुन गेल्याची दुर्दैवी घटना घडली असतानाच आता घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा करणारा पिक अप वाहन या रापट्यावरून घसरले.सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून रापट्यावरील मोठ्या दगडामुळे वाहन पाण्यात जाता जाता वाचले.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,एक पिक अप वाहन घरगुती गॅस सिलिंडर घेऊन ग्राहकांना वितरण करण्यासाठी गडचांदूरवरून कुसुंबी,लिंगनडोहकडे रापट्यावरून जात असताना अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढला.वाहन घसरत पाण्यात जाण्यापूर्वी रापट्यावरील दगडामुळे अडकले. दरम्यान वाहन चालकाने उडी घेऊन आपला जीव वाचवला.या घटनेत कोणतीही हानी झाली नसून सदर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता तयार केला होता.परिसरातील 8 ते 10 गावातील नागरिक व शेतकरी सुद्धा याचा वापर करतात.मात्र हा रापटा यांच्यासाठी जीव घेणा ठरत असून कंपनीने मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामात अडथळा निर्माण केल्याने या ठिकाणी पुलाचे काम झालेले नाही असे आरोप नागरिक करत आहे.या वर्षातील ही दुसरी घटना असून कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असून लगतच्या गोवारीगुडा येथील महिला मोठ्यासंख्येने भांडीकुंडी व कपडे धुण्यासाठी या घाटावर येतात.वरदळीचा रस्ता असल्याने येथे उंच व मोठ्या पुलाची आवश्यकता आहे.मात्र हा रस्ताअतिक्रमित असल्यामुळे अनेक लोकांना मोठ्या अडथळ्यातून प्रवास करावा लागत आहे.संबंधित कंपनीने या ठिकाणी तातडीने पुलाचे निर्माण करून दिलासा द्यावा अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.रापट्यात अडकलेल्या त्या वाहनाला JCB द्वारे काढण्यात आले.
-------//------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ आली.
0 टिप्पण्या