गडचांदूर:-
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर,जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी,या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गडचांदूर शहरात स्वराज्य महोत्सवाची सुरवात करण्यात आली आहे.

हर घर तिरंगा,घर घर तिरंगा' यानिमित्ताने 4 आॕगस्ट रोजी ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात 'हर घर तिरंगा,घर घर तिरंगा' सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 च्या सुमारास तिरंगा ध्वज हातात घेऊन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर शिवाजी चौकातून भव्य बाईक रॅलीची सुरूवात करण्यात आली.शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत सदर रॅलीची सांगता नगरपरिषद येथे झाली.
ठाणेदार आमले,पुरूष व महिला पोलीस कर्मचारी,रजा़ मशिदीचे इमाम सय्यद हसनैन रज़ा,नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम,नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी व सर्व व्यापारी बंधु,शहरातील विवीध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,युवकांसह इतर नागरिकांनी बाईक रॅलीत मोठ्यासंखेने उपस्थिती दर्शवली होती. एकुणच या राष्ट्रीय सणाला गडचांदूरात मोठ्या धुमधडाक्यात सुरूवात झाली असून येत्या 15 आॕगस्ट पर्यंत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या