Subscribe Us

header ads

हर घर तिरंगा' अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली.

 
गडचांदूर:-
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत 9 आॕगस्ट क्रांतीदिनी 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली.सदर रॅली मध्ये शाळा,कनिष्ठ,महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे बॅनर,तिरंगे घेऊन शहरवासीयांचे लक्ष वेधले.सदर रॅली शाळेपासून महात्मा फुले चौक,गांधी चौक, संविधान चौक,साई मंदिर मार्गे भ्रमण करीत शाळेत पोहोचली. 
याप्रसंगी प्रा.प्रशांत खैरे यांनी क्रांतीदिनाचे महत्त्व विषद केले.संचालक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले तर कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक संजय गाडगे,बावनकर सर,वासेकर सर,बोबडे सर,मेश्राम सर,मुप्पीडवार सर, सै.जहीर सर,डफाडे सर,गुजर सर,झाडे सर सातारकर सर,सोनटक्के सर,मेहरकुरे सर,कु.ताजने मॅडम,कु. ताकसांडे मॅडम,उंमरे मॅडम,चटप मॅडम,श्रीमती शेंडे मॅडम तसेच लीलाधर मत्त्ते,संकल्प भसारकर, सिताराम पिंपळशेंडे,शशिकांत चेन्ने,गणपत आत्रम सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
                ----------//--------
                                    'कोरपना LIVE'
                                       मुख्यसंपादक 
                                     सै.मूम्ताज़ आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या