Subscribe Us

header ads

नि:शुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर...!

गडचांदूर:-
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असताना अख्ख्या देशभरात 'आज़ादी का अमृत महोत्सव' मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे.या निमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.याच श्रृंखलेत 16 आॕगस्ट रोजी कोरपना तालुक्यातील नांदाफाटा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वामी विवेकानंद युवा मित्र मंडळ व युवा मित्र परिवार नांदाफाटा,आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे)वर्धा,जिल्हा सामन्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदाफाटा यांच्या सहकार्याने व समता फाउंडेशनच्या पुढाकाराने नि:शुल्क मोतीबिंदू लेन्स,नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये रुग्णांची निःशुल्क तपासणी सह योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.मोतीबिंदूच्या रुग्णांवर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी,जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे निःशुल्क शस्त्रक्रिया तसेच यासाठी रुग्णांची ने-आण,राहणे व जेवनाची निःशुल्क सोय करण्यात आल्याचे कळते.
सदर शिबीरात महिला,पुरूष असे एकूण 213 नागरिकांनी नेत्र तपासणी केली.त्यातील 67 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.तसेच हल्लीच्या पूरपरिस्थितीत आपल्या जिवाची पर्वा न करता तब्बल 7 तास प्रवास करून एका गरोदर महिलेला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सुखरूप घेऊन जाणाऱ्या आशाताई 'लता गेडाम' याचा यानिमित्ताने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नेत्र चिकित्सक डॉ.बुऱ्हान,वैद्यकिय अधिकारी डॉ.कुरेशी,प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथील डॉक्टर, समता फाउंडेशनचे राहूल मोगरकर,पुरूषोत्तम निब्रड, अभय मुनोत,पत्रकार गणेश लोंढे,सतिश जमदाडे सह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन सतिश जमदाडे,आभार सचिन बोढाले यांनी व्यक्त केले.सदर शिबीर,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी,आरोग्य सेविका,आशा वर्कर्स व युवक मित्र परिवार नांदाफाटा इतरांनी परिश्रम घेतले.
                   -----------//---------
                                             'कोरपना LIVE'
                                               मुख्यसंपादक 
                                             सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या