गडचांदूर:-
Court न्यायालयीन सूचनेचे पालन करणे प्रत्येक मंडळाला बंधनकारक राहील,गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळविण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे,festival उत्सव साजरा करताना कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी,या उत्सवाला गालबोट लागेल असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये,उत्साहात गणेशोत्सव साजरा करा,पण नियमांची पायमल्ली होता कामा नये, नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी sdpo सुशीलकुमार नायक यांनी केले.ते गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर 22 आॕगस्ट रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते.देशात आज़ादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.तेव्हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे, शांततापुर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, आकर्षक देखावे,नियोजनबद्ध व शांततापुर्ण मिरवणूक तथा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळाला पोलीस प्रशासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येईल अशी माहिती सुद्धा एसडीपीओ नायक यांनी यावेळी दिली. ठाणेदार सत्यजीत आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनीही उपस्थित गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शकयुक्त सूचना दिल्या.
वास्तविक पाहता कोरोना Covid 19 संकटामुळे मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या निर्बंधांमुळे कोणतेही सण,उत्सव साजरे करता आले नाही.मात्र आता बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथील झाल्याने मोठ्या उत्साहात सण,उत्सव साजरे होत आहे.याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाल्याचे चित्र पहायला मिळत असून याकाळात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीला np न.प.चे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते,गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी,कार्यकर्ते,पत्रकार मंडळी व प्रतिष्ठित नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
-------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली
0 टिप्पण्या