कोरपना:-
जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील शिक्षक रमेश चौधरी यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.या निमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्याध्यापक पदी बढती मिळालेले चौधरी यांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा भाजप तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी मुख्याध्यापक जयपाल राऊत,स्वतंत्र कुमार शुक्ला,जिवणे,जुनगरी,अक्षय चांदूरकर शिक्षक सह शिक्षिका सौ.भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रमेश चौधरी शिक्षक म्हणून या शाळेला लाभले,त्यांनी शिक्षण सेवेच्या माध्यमातून सतत चांगले विद्यार्थी घडवण्याचे जे प्रयत्न केले,ते कधीही विसरण्या सारखे नसल्याचे मत व्यक्त करत हिवरकर यांनी चौधरी यांचे अभिनंदन करत तोंडभरून कौतुक केले.तसेच भविष्यातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. संचालन शिक्षक स्वतंत्र कुमार शुक्ला तर आभार अक्षय चांदुरकर यांनी व्यक्त केले.सदर छोटेखानी कार्यक्रमात कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
---------//--------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या