Subscribe Us

header ads

पक्षात सर्वांना सन्मानाचे स्थान व सन्मानाची वागणूक दिली जाईल.'सतीश उपलेंचवार'

गडचांदूर :-
     कोरपना तालुक्यातील ‍तळोधी येथे नुकताच एका कार्यक्रमाद्वारे येथील विवीध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर विश्वास दाखवत राजूरा विधानसभा विस्तारक तथा गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार यांच्या मार्गदर्शनात व कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्यासंख्येने भाजपात प्रवेश घेतला आहे.मान्यवरांच्या हस्ते पक्ष प्रवेश करणार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन व पक्षाचे दुपट्टे घालून स्वागत करण्यात आला.
      याप्रसंगी अनील संकुलवार,नूतन कुमार जीवने, हरीभाऊ घोरे,निखील भोंगळे,अशोक झाडे,विनोद उरकुडे,प्रशांत खाडे आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सर्व बंधुंचे मी अगदी मनापासून स्वागत करतो.पक्षात सर्वांना सन्मानाचे स्थान व वागणूक दिली जाईल.कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देतो.राज्यात व केंद्रात सध्या भाजपची सत्ता आहे. माजी अर्थमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,माजी जि.प. अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार अॕड.संजय धोटे यांच्या माध्यमातून विकास कामे घडवून अणू असे आश्वासन राजूरा विधानसभा विस्तारक सतीश उपलेंचवार यांनी मार्गदर्शन करताना दिले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन करत सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचा गावात आगमन झाल्यानंतर बस स्टॉप पासून ढोल ताशांच्या गजरात,रॅली काढण्यात आली. यादरम्यान गोंडवाना देवस्थान,तुकडोजी महाराज देवस्थानाचे दर्शन घेत रॅलीने सभा स्थळ गाठले. यावेळी मोठ्यासंख्येने गावातील तरूण व नागरिकांची उपस्थिती होती.संचालन मंगेश डहाके तर प्रीतम नवले यांनी आभार व्यक्त केले.
                          --------//-------
                                  'कोरपना LIVE'
                                    मुख्यसंपादक
                                   सै.मूम्ताज़ अली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या