Subscribe Us

header ads

कृषी विभागाच्या पुढाकाराने 'सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' मार्गदर्शन मेळावा.

कोरपना#Korpana:-
       आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन (PMFME)योजना, कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा दि.15 ते 31आॕगस्ट 2022 निमित्त 30 आॕगस्ट रोजी कोरपना तहसील कार्यालयात तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.केन्द्र सहाय्यक सर्व समाज, घटकांना तसेच 'एकजिल्हा एक उत्पादन' याक्षेत्रात उद्योग उभी व्हावीत,ग्रामीण क्षेत्रात उद्योग वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी,संस्था समूह सहाय्य गट,शेतकरी गट सहकारी उत्पादक संस्था, व्यक्तीक उद्योग उभारणीसाठी शेती उत्पादीत वस्तू प्रक्रिया करून नविन उद्योग उभारणीची संधीचा लाभ व्हावा या हेतूने मार्गदर्शन व प्रकल्प निर्मीतीसाठी आवश्यक बाबी याविषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.तालुका कृषी अधिकारी डमाले,प्रफुल खोब्रागडे, सिल्व्हर फार्मर कंपनीचे सै.आबीद अली.उमेदच्या गोनसुले मॅडम,मंडल अधिकारी आडे,बि.टी.एम. पेंदाम,आशीष ताजने इत्यादींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी कोवे यांची उपस्थिती होती.सदर मेळाव्यात विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करून उपस्थितांच्या प्रश्नांवर समाधानकारक उतरे देऊन निराकरण करण्यात आले. शेतकरी व सभासद महिलांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
                    -------//------
                                     'कोरपना LIVE'
                                        मुख्यसंपादक 
                                      सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या