Subscribe Us

header ads

केंद्र सरकार विरोधात गडचांदूरात काँग्रेसचे धरणे...

गडचांदूर:-
महागाई,बेरोजगारी,अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तूंवरील GST कराच्या विरोधात काँग्रेसने राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन पुकारले आहे.याच पार्श्वभूमीवर 5 आॕगस्ट रोजी गडचांदूर येथील राजीव गांधी चौक येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई दिवसेंदिवस उच्चांक गाठत असून जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने गोरगरीबांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे.
या सरकारने पेट्रोल,डिझेल,गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंवर GST कर लावून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.श्रीलंकेत आज जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती येथेही उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मोदी सरकारने महागाई कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करत काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, शहराध्यक्ष संतोष महाडोळे,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी,नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम, नगरसेविका जयश्री ताकसांडे,रामलू बालसनीवार, नगरसेवक पापय्या पोन्नमवार,जेष्ठ नेते नामदेवराव येरणे,न.प.माजी उपाध्यक्ष सचिन भोयर,नगरसेवक तथा गटनेता विक्रम येरणे,सतीश बेतावार,संजय रणदिवे,रूपेश चुदरी,शैलेश लोखंडे,उमेश राजूरकर, दिलीप वांढरे,गणेश आदे,सुधीर पिंपळकर,नारायण डोंगरे,राहूल ताकसांडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
                        --------//------
                                         'कोरपना LIVE'
                                          मुख्यसंपादक 
                                          सै.मूम्ताज़ अली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या