गडचांदूर:-
अंबुजा फाउंडेशनद्वारा संचालित,अंबुजा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे आयटीआय गडचांदूरला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकाकडून नागपूर विभागातील सर्वोत्कृष्ट 'आयटीआय' म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार 2018 पासून सुरू करण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय 3 व विभागस्तरीय 6 असे एकूण 9 पुरस्कार दिले जातो.सन 2020 आणि 21सत्राच्या पुरस्कारासाठी नागपूर विभागात कार्यरत एकूण 883 शासकीय व अशासकीय संस्थामध्ये अंबुजा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सर्वोत्कृष्ट आयटीआय' म्हणून निवड झाली आहे.
संस्थेला मिळालेला हा पुरस्कार अत्यंत भुषणावह गोष्ट असून संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डी. ए.दळवी,सहसंचालक योगेश पाटील,उपसंचालक नितीन निकम व महासंचालक नागपूर विभाग पी.टी. देवतळे,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी चंद्रपूर,अंबुजा सिमेंटचे युनिट हेड कृष्णमोहन,अंबुजा फाउंडेशनच्या सी.ई.ओ.श्रीमती पर्ल तिवारी,उपाध्यक्ष कौशल्य विकास रवी नायसे व अंबुजा सिमेंट फाउंडेशन व्यवस्थापन समिती व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्रशिक्षक तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
--------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली
1 टिप्पण्या
Congratulations team SEDI Ambuja.
उत्तर द्याहटवा