कोरपना:-
जिवती तालुक्याकडे जाणारा कोरपना तालुक्यातील कुसळ,धानोली,धनकदेवी रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून तयार करण्यात आला होता.या रस्त्यावरील माथाफाटा येथे काही महिन्यापूर्वी एका मोबाईल टॉवरचे काम करण्यात आले.यासाठी संबंधित कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवल्याने मोठा खड्डा पडला आहे.वास्तविक पाहता काम झाल्यावर खड्डा बुजविण्याची गरज होती.मात्र कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याची खंत काही वाटसरू व्यक्त करताना दिसत आहे.परिणामी सध्या परिस्थितीत हा खड्डा अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.अनेक दुचाकीस्वार याठिकाणी पडून किरकोळ तर गंभीर जखमी झाल्याचे कळते.एकीकडे कंत्राटदाराचा दुर्लक्षितपणा वाहतुकीला खोळंबा निर्माण करणार ठरत आहे तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी सीमा सोडून रस्त्यावर तारेचे कुंपण घालून यावर अधिक भर टाकल्याचे आरोप होत आहे.सदर रस्ता वरदळीचा असल्याने नागरिकांना वाहतुकीला मोठ्याप्रमाणात त्रासदायक बनला आहे.संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमण असल्यास काढावे,विनापरवानगीने खड्डे खोदून रस्ता खराब केल्याबद्दल संबंधितावर योग्य ती कारवाई करावी व तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.आता संबंधित विभाग याकडे केव्हा लक्ष देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या