Subscribe Us

header ads

कन्हाळगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी....

कोरपना:-
   कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पावन पर्वावर हरी भक्त पारायण विठ्ठल डाखरे महाराज यांनी आपल्या वाणीतून दहीहंडी काल्याचे कीर्तन करून उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.तर मोठ्या उत्साहात बाल गोपालांनी दहीहंडी फोडली. याप्रसंगी बापूजी पिंपळकर,प्रा.संजय ठावरी, प्रा. विनोद पेंदाम,श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष अरूण नवले, सचिव शांताराम देरकर,दिनेश राठोड,मदन नवले, तुलसीराम टेकाम,सुरेश गारघाटे,टीकाराम धुर्वे,राजू नवले,पारडी वनविभागाचे टेकाम,देवीदास गारघाटे, हिरालाल केसकर,पारखी महाराज,अनील महाराज, पुंडलिक गिरसावाळे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.परीसरातील महिला,पुरूष व बालगोपालांनी किर्तनाचा लाभ घेतला.या महोत्सवात वेशभुषा साकारलेल्या मुलांना पारितोषिक देण्यात आले.कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे,डाखरे महाराज,डॉ.प्रमोद परचाके, प्रतीक बोरडे,विनोद कुमरे,गारघाटे यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यत आला. मोठ्याप्रमाणात भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.संचालन प्रा.संजय ठावरी तर अध्यक्ष अरूण नवले यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरूणांचे योगदान मोलाचे ठरले.
                      --------//-------
                                            'कोरपना LIVE'
                                             मुख्यसंपादक 
                                              सै.मूम्ताज़ अली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या