गडचांदूर:-
प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला.ग्रंथालय विभातर्फे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर.रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद मुसने, ग्रंथालय प्रमुख प्रा.पंकज देरकर,प्रा.नानेश धोटे,प्रा. राहुल ठोंबरे,प्रा.महेश मडावी सह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी प्राचार्य अरविंद मुसने यांनी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.ग्रंथपाल प्रा.पंकज देरकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. मनीषा मरसकोल्हे,आभार प्रा.रेणू मॅडम यांनी व्यक्त केले.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सुरज टेकाम व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
---------//--------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या