गडचांदूर #Gadchandur.
शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आयोजित शेतकऱ्यांचे पंचप्राण युगात्मा 'स्व.शरद जोशी' यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गडचांदूर येथील भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा येथे 'शेतकरी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार,शेतकरी नेते अॕड.वामनराव चटप करणार असून शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते विलास धांडे,स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष नीलकंठराव कोरांगे,शे.सं. माजी तालुकाध्यक्ष प्रविण सावकार गुंडावार,माजी पं. स.सदस्य रमाकांत मालकर,शे.सं.तालूकाध्यक्ष युवा आघाडी अविनाश मुसळे,शे.सं.शहराध्यक्ष संतोष पटकोटवार.माजी पं.स.उपसभापती मदन सातपुते,शे. सं.जिल्हाध्यक्ष अरूण नवले,शे.सं.तालुकाध्यक्ष बंडू राजुकर,शे.सं.जेष्ठ नेते वासूदेव गौरकार,माजी पं.स. सभापती रवी गोखरे,शे.सं.युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मुसळे,शे.सं.जेष्ठ नेते शेख खाजा व इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे.सदर मेळाव्याला समस्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मागणी वजा आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
-------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या