Subscribe Us

header ads

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलतर्फे नगराध्यक्षांना निवेदन...!

गडचांदूर:-
कोरपना तालुक्यात नावाजलेले शहर गडचांदूर येथील राजूरा,कोरपना मुख्य मार्ग व शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरांनी अक्षरशः हैदोस घातल्याचे चित्र आहे.या जनावरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून मुख्य मार्गावरील वाहतुकीला मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. अपघाताची शक्यता बळावली असून या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील संपूर्ण प्रभागात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलतर्फे न.प. नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देताना अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष आसिफ किडीया,वैभव गोरे,सदानंद गिरी यांच्यासह इतर राकाँ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
                          -------//-------
                                         'कोरपना LIVE'
                                            मुख्यसंपादक 
                                               सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या