गडचांदूर:-
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत वर्ग 5 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वातंत्र्याच्या संग्रामात शहीद झालेल्या जवानांच्या आठवणी गीतांच्या माध्यमातून ताज्या केल्या.याप्रसंगी अनेकांचे डोळे अक्षरशः पानावले होते.
या स्पर्धेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.सदर स्पर्धा वर्ग 5,7,8 आणि 10 अशा दोन गटात घेण्यात आली. स्पर्धेचे संचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख महेंद्रकुमार ताकसांडे यांनी तर स्पर्धेचे परीक्षक सुरेश पाटील,राजेश वासेकर यांनी सांभाळले.या स्पर्धेत वर्ग 5 ते 7 या गटातून प्रथम कु.श्रेया भालेराव,नंदिनी अर्कीलवार,लायबा शेख,श्रावणी दाते,द्वितीय क्रमांक अक्षदा गौरकार तर तृतीय क्रं.साहिल वासेकर,हिमेश बावणे यांनी पटकाविला.वर्ग 8 ते 10 या गटात प्रथम क्रं.श्रृती अरकीलवार,द्वितीय क्रं.तृप्ती गुरूनुले,नम्रता गुंडले तर तृतीय क्रं.अंकुश बावणे,धनश्री खिरटकर या विद्यार्थ्यांनी मिळविला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जी.एन.बोबडे,ज्योती चटप,श्रीमती सुषमा शेंडे,माधुरी उंमरे,जीवन आडे,सी.एम.किन्नाके,बाळकृष्ण मरसकोल्हे,भालचंद्र कोंगरे,बावनकर सर,शशिकांत चेन्ने यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
---------//---------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या