Subscribe Us

header ads

त्या...!जन्मठेपेच्या आरोपींची शिक्षा कायम ठेवा. 'AIMIM' आक्रमक.

चंद्रपूर:-
बिलकीस बानो प्रकरणात न्यायालयाने 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.मात्र 15 आॕगस्ट 2022 रोजी गुजरात सरकारद्वारा गठीत माफी समितीच्या शिफारसी नुसार या आरोपींना सोडण्यात आले.याच्या निषेधार्थ 20 आॕगस्ट रोजी आॕल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)जिल्हा महिला विंग चंद्रपूर कमिटीच्या वतीने स्थानिक जटपूरा गेट जवळ तिव्र विरोध प्रदर्शन करण्यात आले. बिलकीस बानोच्या आरोपींना पुन्हा तुरूंगात टाका अशी मागणी यावेळी करण्यात आली. न्यायलयाचा मान सन्मान राखणे प्रत्येकाचे कर्तव्य असून आम्ही सुद्धा राखतो.मात्र त्या आरोपींच्या सुटकेसाठी गुजरात सरकारने कायद्याचा दुरुपयोग केल्याचे आरोप AIMIM तर्फे करण्यात आले आहे.
बिलकीस बानोवर झालेला अन्याय हा माणुसकीला लाजिरवाणा असून कोणत्याही परिस्थितीत माफी योग्य नाही.बिलकीस बानो प्रकरणी आरोपी ठरलेल्या त्या 11 ही जणांची माफी रद्द करून न्यायलयाने सुनावलेल्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवून त्यांना तुरुंगात टाकावे आणि बिलकीस बानोला न्याय द्यावा अशी मागणी करत तिव्र शब्दात गुजरात सरकारचा निषेध करण्यात आला.या संदर्भात चंद्रपूर AIMIM तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अॕड.नाहीद हुसैन यांच्या नेतृत्वाखाली AIMIM च्या या विरोध प्रदर्शनात चंद्रपूरच्या महिला, पुरूष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती दर्शवून गुजरात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.हे आरोपी आता मोकाट असल्यामुळे पुन्हा बिलकीस प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही याची शाश्वती काय ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.
                      ---------//--------
                                      'कोरपना LIVE'
                                      मुख्यसंपादक
                                     सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या