गडचांदूर मयूर एकरे:-
कोरपना,गडचांदूर gadchandur मार्गावरील खिरडी या गावा जवळ 24 आॕगस्ट रोजी एका उभ्या कारने अचानकपणे पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती.'बर्निंग कार' चे थरारक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती.या महिन्यातील याच मार्गावरील ही दुसरी घटना असून पांडूरंग थोरात असे कार मालकाचे नाव आहे.
या संदर्भात सविस्तर असे की,पांडूरंग थोरात हे इंडिका कार क्रं.MH34AA0280 घेऊन घरून निघाले. दरम्यान खिरडी फाट्याजवळ रस्त्यावरच्या बाजूला कार उभी करून शेतात जात असताना अचानकपणे car is burned कारने पेट घेतला.पांडूरंग यांनी धाव घेत कार जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण कारने मोठ्याप्रमाणात पेट घेतला होता.सदर घटनेची माहिती गडचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले यांना मिळताच त्यांनी पोलीसांसह घटनास्थळी धाव घेत अग्निशमन वाहनाला पाचारण केले व आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.मात्र तोपर्यंत कार पुर्णपणे जळाली होती.आग कशामुळे लागली याचे गुढ कायम असून पुढील तपास सुरू असल्याचे कळते.पोलीस हवालदार संदीप अडकीने,पोलीस कर्मचारी धवने यांची यावेळी उपस्थिती होती.
-------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या