Subscribe Us

header ads

'ते...!विनापरवानगी बॅनर प्रकरण तापतय.'

गडचांदूर:-
   नगरपरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती शरद जोगी यांचा 1 आॕगस्ट रोजी वाढदिवस होता.यानिमित्ताने शहरातील चौका चौकात मोठमोठे बॅनर लावण्यात आले.हे बॅनर लावण्या आधी स्थानिक नगरपरिषदेची रितसर परवानगी घेणे आवश्यक होते मात्र असे झाले नाही.दरम्यान बॅनरवर कारवाई करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना बर्थडे बॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मज्जाव करून मुख्यमार्गावर राडा केला.यानंतर N.P. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्या विरोधात उपाध्यक्ष जोगी यांनी पोलीस स्टेशनात तक्रार दिली.यासर्व घडामोडीमूळे न.प.कर्मचार्‍यामध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांनी मुख्याधिकारी यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. 'येताय 15 आॕगस्ट स्वातंत्र्यदिनी न.प.उपाध्यक्ष शरद जोगी यांच्या हस्ते होणार्‍या ध्वजारोहणाला नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.' या पवित्र्यामुळे,आता ते विना पवरवानगी बॅनर प्रकरण तापतय की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार सविस्तर असे की, 1 आॕगस्ट रोजी न.प.चे कर्मचारी अवैध बॅनर कार्यवाही करण्यास गेले असता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारी कामात दखल दिली व ताणतणावाचे वातावरण निर्माण करण्यात आले. याविषयी उलटपक्षी अवैध बॅनर वर कार्यवाही करणारे कर्मचार्‍यांबाबत पोलीस स्टेशन येथे संबंधितांनी खोटी तक्रार दाखल केल्याने संबंधिताच्या हस्ते येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकवण्यात आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.तसेच उपरोक्त खोट्या तक्रारीमूळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याने याद्वारे आपण उचित कार्यवाही करून अशा गैरप्रकारांना आळा घालावा अशी विनंती वजा मागणी न.प.चे स्वप्निल पिदुरकर, कपील नल्लेवार,प्रमोद वाघमारे,संतोष गोरे,संतोष करदोळे,अमीत निमकर,मनोज कुंभारे,चरणदास शेडमाके,विक्रम क्षीरसागर,सचिन कांमळे,टिके पेटकर, सौ.प्रिया ठाणेकर,कु.मेघा माने यांनी पत्राद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून शरद जोगी हे शहरातील गांधी चौकात दरवर्षी ध्वजारोहण करतात हे मात्र विशेष.आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------//---------
                                           'कोरपना LIVE'
                                          मुख्यसंपादक
                                         सै.मूम्ताज़ अली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या