गडचांदूर#gadchandurpola2022:-
कोरपनाkorpana तालुक्यातील गडचांदूर शहरात पोळा उत्सव समिती,पोलीस स्टेशन,नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक येथे आयोजित pola festival बैल पोळा व तान्हा पोळा अतिशय शांततापूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.नंदीबैल सजावट, वेशभूषा,उत्कृष्ठ देखावा स्पर्धा compitition आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत मोठ्यासंखेने बालगोपालांनी आपल्या नंदीबैल सजावटीसह विविध वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली.देशभक्तीपर सादर केलेले देखावे,शेतकरी आत्महत्या,स्त्री भ्रूणहत्या व इतर सामाजिक विषयांवरील साकारलेले देखावे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले.
नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेची परीक्षकांनी पाहणी व मुल्यांकन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.covid 90 कोरोनामूळे दोन वर्ष सर्व कार्यक्रम, सण उत्सवावर शासनाने निर्बंध घातले होते मात्र आता परिस्थितीत सुधारणा झाल्याने निर्बंधमुक्त सण उत्सव साजरे होत आहे.
या पार्श्वभूमीवर इतर सण उत्सव पाठोपाठ यंदाचा पोळा मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने साजरा करण्यात आला.यामध्ये सर्वधर्मीय बांधवांनी उपस्थिती दर्शवून मनसोक्त आनंद घेतला.या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.एकुणच गडचांदूर gadchandur येथे पोळा उत्सव शांततापूर्ण peacefully वातावरणात व उत्साहात साजरा झाला.
--------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या