कोरपना,#korpana:-
"ईडापीडा टळो,सुगीचे दिवसं येवो" अशी प्राथना करत वर्षभर कष्ट करणारा बळीराजा पोळा सणाच्या दिवशी मोठ्या थाटामाटात बैलाची पुजा करतो.वर्षभर farmers शेतकऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा,राजाला यानिमित्ताने श्रावण महिन्याच्या शेवटी महिनाभर उपवास ठेवून शेतकरी हा आपल्या बैलाच्या पुजनाचे कार्यक्रम करतो.कित्येक ठिकाणी तोरणावरून वादविवादाचे प्रकारही घडत असतात. मात्र कोरपना तालुक्यात एक गाव असे ही आहे जिथे गेल्या अंदाजे 26,27 वर्षापासून तोरणा शिवाय मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा होतो.

यादिवशी शेतकरी तुतारी,काठी पोळ्यात नेत नाही.ही परंपरा आजही सतत सुरू असून या दिवशी गावातील सर्व जाती धर्माचे लोकं एकत्रीत येऊन मोठ्या आनंद व उत्साहाने सण,उत्सव साजरे करत एकमेकांना शुभेच्छा देतात.गावातील परंपरा कायम ठेवीत यावर्षीही शेतकऱ्यांनी पोळ्यामध्ये तुतारी,लाठीचा वापर न करता बैल सजवून गावात रॅली काढली. गावातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येऊन शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा congrats दिल्या.
गावकऱ्यांनी परंपरा कायम ठेवत,शांततापुर्ण वातावरण व थाटामाटात हा सण उत्सव साजरा केल्याबद्दल सै.आबीद अली,मुरलीधर डाखरे,खुशाल राठोड,प्रभाकर पवार,इस्रो मडावी,मोतीराम कोरवते, दुर्गा मडावी,दौलत गोरे,विठ्ठल कुचनकर,संजय जाधव, चंपत येडमे,चंद्रभान तोडासे,सोनू तिखट,चांदेकर, पोलीस पाटील महादेव राठोड इत्यादींनी गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.याच बरोबर या गावात नेहमी सर्वधर्म सण,उत्सव अगदी peacefully शांततेत व बंधुभावाने पार पडतात हे मात्र विशेष.
---------//--------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ आली.
0 टिप्पण्या