Subscribe Us

header ads

शेवटी..! त्या इमारतीचे लोकार्पण झाले. #New building launch.

गडचांदूर#Gadchandur

     कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील तलाठी,मंडळ अधिकारी कार्यालय New offic व येथील ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज अशा नवीन प्रसूती कक्षाचे लोकार्पण 30 आॕगस्ट रोजी MLA आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आला. वास्तविक पाहता तलाठी,मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम एका वर्षात पुर्ण होणे अपेक्षित होते.मात्र याला जवळपास दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागला.असे असताना इमारतीची रंगरंगोटी व इतर आवश्यक ती संपुर्ण कामे झाल्यानंतरही केवळ विद्युत मिटरसाठी Electric mitter अंदाजे 2 ते 3 महिने लागले.शेवटी इमारतीचे लोकार्पण झाले आणि संबंधितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.याकाळात सदर कार्यालय बाजूच्या एका किरायाच्या घरामध्ये सुरू असल्याने संबंधित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता.आता मात्र नवीन इमारतीत मोकळ्या वातावरणात सोईस्कररित्या कामे होणार आहे.
     गडचांदूर तलाठी साजा अंतर्गत 5 गाव समाविष्ट असून मंडळ अधिकारी कार्यालय सुद्धा याच ठिकाणी आहे.स्थानिकांसह तलाठी साजा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक सातबारा,जमिनीचे फेरफार,उत्पन्न दाखले व संबंधित विभागाशी निगडित इतर कामांसाठी याच कार्यालयात येत असल्याने याठिकाणी मोठी गर्दी असते.अपुरी जागा व संकुचित खोल्यांमध्ये सुरू असलेल्या सदर कार्यालयात लोकांना मोठ्याप्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत होता.ही बाब लक्षात घेऊन शासनाने याठिकाणी नवीन इमारत बांधण्याची परवानगी दिली. मात्र अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या इमारतीच्या कामाला अखेर पुर्ण विराम मिळाला हे मात्र विशेष.
सदर लोकार्पण सोहळ्यात उपविभागीय अधिकारी संपत खलाटे,तहसीलदार महेंद्र वाकलेकर,मंडळ अधिकारी नारायण चव्हाण,तलाठी सोहेल अंसारी, उपविभागीय बांधकाम अभियंता आकाश बाजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय घाटे,डॉ.महेश हिरादेवे, न.प.नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,राकाँ विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे,काँग्रेस तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे,न.प.उपाध्यक्ष शरद जोगी,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी,सतिश बेतावार,बिबी ग्र.पं.चे माजी उपसरपंच प्रा.आशिष देरकर,नगरसेवक तथा गटनेता विक्रम येरणे,माजी न. प.उपाध्यक्ष सचिन भोयर,राकाँ जिल्हा महासचिव रफीक निज़ामी यांच्यासह इतर काँग्रेस,राकाँ पदाधिकारी,कार्यकर्ते,नगरसेवक व नागरिकांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.या सोहळ्याचे औचित्य साधून तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण Plantation करण्यात आले.
  
                       -------//------
                                         'कोरपनाLIVE'
                                            मुख्यसंपादक 
                                              सौ.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या