गडचांदूरGadchandur:-
वर्तमान युगात विद्यार्थी जीवनात स्पर्धा परिक्षेविना Competitive exam पर्याय नाही.हे जाणून प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूरतर्फे विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व निःशुल्क मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले असून सदर कार्यशाळेत चंद्रपूर संकल्प अकॅडमीचे लहूजी कांबळे व फिजिकल एक्सपर्ट श्याम राठोड हे सलग 4 दिवस परीक्षापद्धती, अभ्यासक्रम,बुद्धिमत्ता,सामान्य ज्ञान,वेळेचे नियोजन व शारीरिक क्षमता या अनुशंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहे.सदर निशुल्क कार्यशाळेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते Social worker बालाजी पुरी यांच्या शुभहस्ते होणार असून नामदेवराव ठेंगणे सर अध्यक्षस्थानी तर रमेश राठोड सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा कार्यशाळेला परिसरातील विद्यार्थ्यांनी Students बहुसंखेने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन सदर महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
--------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या