Subscribe Us

header ads

Student life विद्यार्थी जीवनात स्पर्धेशिवाय पर्याय नाही.

गडचांदूर:-
           'आजचे युग स्पर्धेचे असून विद्यार्थी जीवनात स्पर्धेशिवाय पर्याय नाही,स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर अधिकारी पद मिळवायचे असेल तर सततच्या कठोर परिश्रमातून ते प्राप्त होईल' असे प्रतिपादन प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूरतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात,arya the best 'आर्या दी बेस्ट अकॅडमी' चे संचालक हितेश जाधव यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव ठेंगणे सर तर प्रा.डॉ.राजकुमार मुसने,प्राचार्य अरविंद मुसने यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.आपल्या मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या माध्यमातून 495 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या हितेश जाधव यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.पंकज देरकर,प्रास्ताविक प्रा.नानेश धोटे तर आभार प्रा.मनीषा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.महेश मडावी,प्रा.राहुल ठोंबरे,रेणू मॅडम व सूरज तलांडे यांनी विशेष सहकार्य केले.सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.
                     ---------//-------
                                           'कोरपना LIVE'
                                            मुख्यसंपादक 
                                            सै.मूम्ताज़ अली.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या