गडचांदूर:-#Korpanalive news.
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे व प्रतिष्ठेचे मानले जाणारे शहर गडचांदूरचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र नगरविकास मंत्रालयातर्फे Maharashtra nagarvikas mantralya शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.विकास आराखडा तयार करताना हरकती घेण्याची तरतूद असून नियोजन अधिक चांगले होण्यासाठी नागरिकांची मते जाणून घेणे तितकेच महत्वाचे मानले जाते.हरकती व सूचना मांडण्याची तरतूद असल्याने चंद्रपूर जिल्हा नगररचनाकार कार्यालयाकडून Chandrapur Jilha nagarrachanakar karyalay यासंदर्भात गडचांदूर न.प.ला सूचना देऊन 16 सप्टेंबर रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शहराचा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष,उपाध्यक्ष व काही नगरसेवकांनी या महत्वाच्या बैठकीला दांडी मारून सिद्ध केले की,यांना शहराच्या विकासाबद्दल Shahar vikas काहीही देणेघेणे नाही.
सदर बैठकीला नगर रचनाकार Nagar rachnakar दहिकर व सहाय्यक नगर रचनाकार बाल्लमवार यांची उपस्थिती होती. ''शहरात कशाची उणीव सर्वात जास्त भासते, कोणत्या वार्डात कशाची उणीव सर्वात जास्त भासते,तुमच्या शहरात कुठली गोष्ट तुम्हाला सर्वात महत्वाची वाटते,शहराचे वैशिष्ठ काय ? तुमच्या शहराची ओळख आज काय आणि पुढील 20 वर्षात कशी निर्माण झाली पाहिजे,असे तुम्हाला काय वाटते, शहरात कोणत्या सुविधा उपलब्ध आहे,आठवडी बाजार,मटण मार्केट,बसस्टैंड Bustand येथे वाहन स्थळ उपलब्ध आहे का,शहरात वाहन स्थळ कुठे असणे आवश्यक आहे,वाहन स्थळाची आवश्यकता आहे का,शहरात अपघात स्थळ कोणते,शहरात वाहतूक कोंडी होणारे ठिकाण कोणते,पाण्याचा स्रोत काय,पाण्याची गुणवत्ता कशी आहे,बालवाडी,प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा,खेळाचे मैदान,रुग्णालय, बगीचे,सांस्कृतिक,धार्मिक,आध्यात्मिक केंद्र,दहनभूमी, अग्निशमन सुविधा'' अशाप्रकारे माहिती मागविण्यात आली.सदर बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक,गटनेता विक्रम येरणे,विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,शिवसेनेचे नगरसेवक सागर ठाकुरवार,शेख सरवर,विजय ठाकूरवार,नगरसेविका सौ.अहिरकर,सौ. कोडापे,काँग्रेसचे नगरसेवक पापय्या पोन्नमवार,नगरसेविका सौ.जयश्री ताकसांडे,सौ. मिनाक्षी एकरे,सौ.वांढरे यांनी उपस्थिती दर्शवून मते मांडली.शहारातील प्रतिष्ठीत नागरिक प्रा.गुजर यांची उपस्थिती होती.यावेळी नगरपरिषदकडून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भोयर,प्रशासकिय अधिकारी चरणदास शेडमाके,बांधकाम विभाग अभियंता अनुप भगत व संतोष गोरे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
(सध्या न.प.उपाध्यक्षांच्या मागे N.p.upadhyaksh त्या प्रकरणाचा ससेमिरा लागल्याने ते शहरा बाहेर असल्याचे कळते.पण शहरातील प्रथम नागरिक न.प. च्या नगराध्यक्षांनी तरी या बैठकीला उपस्थित राहण्याची गरज होती.परंतू त्यांना काम असल्याने उपस्थित राहू शकले नाही,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.)
Tyanna baithkiche mahtva kadlech nahi 'ashcharya'
#Korpana #Gadchandur #Chandrapur
---------//-------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या