Subscribe Us

header ads

महागडे रिचार्ज आणि नेटवर्कची बोंब.लक्ष कोण देणार? #Expensive recharge and no coverage who will attention.

गडचांदूर:-#Korpanalive News.
       कोरपना,जिवती तालुक्यातील हजारो नागरिक वोडाफोन,आयडिया,जिओ,एअरटेल अशा नावाजलेल्या कंपन्यांचे सिम वापरत आहे.मात्र काही अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसल्याने ग्राहकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.भ्रमनध्वनीवरून संपर्क होत नसल्याची बोंब सुरू असून या सिमकार्ड कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरशः वेठीस धरल्याचे चित्र आहे.Sim card companies hav become a headache for customers नको त्या गोष्टीत मोठमोठे आंदोलन करणारे तथाकथित नेते या समस्या विषयी गप्प का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ? बरेच जण फेसबुक,व्हॉट्सअँप,इन्स्टाग्रामचा वापर करतात. चिमुकल्या पासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचे वेड लागले आहे.मुलांचे शिक्षण, शेतकऱ्यांची कामे,मोठमोठ्या कार्यालयातील कामे आॕनलाईन होत आहे.परंतू नेटवर्क शिवाय सगळीकडे बोंबा बोंब सुरू आहे.एकीकडे 5G ची सुरूवात होत आहे तर दुसरीकडे येथे नेटसाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. 'लाखो सिमकार्ड आणि टॉवर कमी' यामुळे रेंज मिळत नाही.सध्या परिस्थितीत मोबाईल इतर जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत एक महत्वाचे घटक बनले असून नेटवर्क नसल्याने विविध कामांसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महागडे रिचार्ज करूनही सिमकार्ड कंपन्या व्यवस्थित सुविधा देत नसेल तर ही ग्राहकांची सपशेल फसवणूकच,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Digital India डिजिटल इंडियाचे भव्यदिव्य स्वप्न दाखवणार्‍यांनी याकडे लक्ष देऊन नेटवर्क न पुरवणाऱ्या सिमकार्ड कंपन्यांना यासंदर्भात धारेवर धरण्याची गरज आहे मात्र असे होताना दिसत नाही. हजारोंचे मोबाईलला नेटवर्क नसल्याने मोबाईल निव्वळ शोभेची वस्तू बनली आहे.हल्ली कुणालाही विचारले तर एकाच उत्तर मिळते 'काय राव....!मोबाईलला नेटवर्कच नाही.' अनेक शासकीय काम आनलाईन पद्धतीने होत असल्याने कवरेजमुळे कामांची गती मंदावली आहे.वापर जास्त आणि नेटवर्क कमी अशी परिस्थिती असून ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.ग्राहकांना अक्षरशः वेठीस धरले जात असून एकतर फोन लागत नाही आणि लागलाच तर संभाषण नीट होत नाही.कधी कधी तर एकाला लावले तर चक्क दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीला लागतो.यामुळे मोबाईल धारक मागील कित्येक महिन्यांपासून या सिमकार्डमुळे कमालीचे त्रस्त आहे.पैसे खर्चुनही नेटवर्कची बोंब सुरू असून संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. सिमकार्ड कंपन्या मस्त,ग्राहक त्रस्त अशी अवस्था सध्या पहायला मिळत असून ग्राहकांकडून हजारोंचे रिचार्ज करून घेता मग व्यवस्थित सुविधा का देत नाही ? असा निर्वाणीचा प्रश्न ग्राहक उपस्थित करताना दिसत आहे.'मागणीनुसार पुरवठा' हे धोरण स्वीकारून Towns and villages शहरांसह खेड्यापाड्यातील कानाकोपऱ्यात नेटवर्क पोहचवण्याची व्यवस्था करावी अशी बोंब सुरू आहे.मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
Expensive recharge and No coverage,who will attention ?
                      -------//--------
'कोरपनाLive'मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या