गडचांदूर#Korpanalive news.
साई शांती युवा गणेश मंडळ हे विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असतात.यंदा मंडळाने मोफत मोतीबिंदू व डोळे तपासणी शिबीर तसेच महिला वर्गात उद्योजकता निर्माण व्हावी म्हणून आनंद मेला, युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून युथ आयकॉन सत्कार व मार्गदर्शन समारंभ आयोजित केला होता. यावेळी 'चेव्हनिंग लिडर' ॲड.दीपक चटप यांनी नेत्रचिकित्सक डॉ.बुऱ्हान यांच्याकडे फॉर्म भरून नेत्रदानाचा संकल्प केला तर त्यांचासमवेत मंडळातील युवकांनी देखील नेत्रदानाचा संकल्प eyes donation करून समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान सत्कार समारंभात बोलताना ॲड.दीपक चटप म्हणाले की,गेल्या 2 महिन्यांत जवळपास 250 हून अधिक सत्कारांना उपस्थिती लावली.हे यश सार्वजनिक झाले असून याचा मनापासून आनंद वाटतो.तुम्ही सत्कारात दिलेल्या शाली ह्या अनाथाश्रम, बालसुधारगृह व वृद्धाश्रमात देणार आहे.तसेच सत्कार प्रसंगी मिळालेली पुस्तके जी मी वाचली नाही ती सोडून तुम्ही दिलेली इतर पुस्तके कोलाम विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोलाम विकास फाउंडेशनने सुरू केलेल्या जिवती तालुक्यातील रायपुर येथील वाचनालयास नुकताच भेट दिली आहे.अजूनही सत्कारांचा ओघ सुरूच असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.लंडनमधून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर इथल्या शेतकरी,आदिवासी,कामगार व दुर्बल घटकांसाठी पुन्हा जोमाने काम करेल,येणारा काळ हा ग्रामीण भागातील युवकांचा असेल,गणेश मंडळांनी सामाजिक दायित्व जोपासले पाहिजे,आपल्याला जे मिळते ते समाजामुळे आणि त्यामुळे जितके शक्य तितके योगदान दिले पाहिजे.साई शांती युवा गणेश मंडळाचे सामाजिक योगदान उल्लेखनीय असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. 

ॲड.दीपक चटप यांनी ज्ञानाच्या जोरावर नावलौकिक मिळवले,आमच्यातला एक मित्र सातासमुद्रापार जात असल्याचा आनंद आहे,नवी पिढी शिक्षित व्हावी यासाठी शैक्षणिक जागृतीच्या दृष्टीने विविध उपक्रम मंडळ हाती घेईल अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष वैभव राव यांनी दिली.यावेळी मंडळाचे सचिव निलेश चिने, सुहास बोंडे,आकाश गायकवाड,सुमित नागे,दत्तू पानघाटे,अक्षय मेश्राम,अतुल बोबडे,अभिजित पाचभाई,मयूर येडमे,संकेत बोढे,सूरज बोबडे,विशाल राव,नंदकिशोर ठावरी,अंशूल ताकसांडे,गिरीश धवणे, सहिल नागे,नीरज मालेकर आदी युवकांची उपस्थिती होती.

--------//--------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या