Subscribe Us

header ads

'बाप्पाची सर्वधर्मीय महाआरती' ganesh-aarti

घुग्घुस:-Ghugus News.
    लोकमान्‍य टिळकांनी ब्रिटीशांविरूध्‍द जनजागृती करण्‍यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सवाची मुहुर्तमेढ रोवली.सद्भावना,सलोखा,सामाजिक समरसता, बंधूभाव आणि राष्‍ट्रप्रेम अशा सर्व भावनांनी ओतप्रोत गणेशोत्‍सव साजरा होणे आज अपेक्षित आहे.देवराव भोंगळे आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी 'श्री गणेशाची' सर्वधर्मीय महाआरती आयोजित करून सामाजिक ऐक्‍याचा अनोखा संदेश दिला आहे.या गणेशोत्सवाच्‍या माध्‍यमातुन समाजसेवेचा,लोककल्‍याणाचा संदेश सर्वसामान्‍य जनतेपर्यंत पोहचेल असा विश्‍वास वने, सांस्‍कृतीक कार्यक्रम तथा मत्स्य व्यवसाय राज्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्‍त केला.8 सप्‍टेंबर रोजी घुग्‍घुस येथील गांधी चौकातील 'जय श्रीराम गणेश मंडळ' तर्फे सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन करण्‍यात आले होते.ही महाआरती सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाली.त्‍यांच्‍यासह हिंदु,मुस्लिम, सिख,बौद्ध,ख्रिश्‍चन धर्मातील प्रतिनिधींनी देखील गणेशाची महाआरती केली.
भाजप जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या संकल्पनेतून सदर महाआरतीचे आयोजन करण्‍यात आले होते. सुधीर मुनगंटीवार यांचे घुग्‍घुस शहरात आगमन होताच भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली.जागोजागी त्‍यांचे औक्षण करण्‍यात आले.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सुधीरभाऊंच्या हस्ते नागरिकांना रेशनकार्डचे वितरण करण्‍यात आले.तसेच ऐकता गणेश मंडळाला त्‍यांच्‍या हस्‍ते स्‍पीकर संच भेट देण्‍यात आला.यावेळी हिंदु धर्माच्‍या वतीने पंडीत गौरीशंकर मिश्रा,पं.अनिल त्रीपाठी,पं.वर्मानंद चौबे,पं.गजानन चिंचोलकर,पं. दिपक पांडे,प्रदीप कोहळे,मधुकर मालेकर.बौध्‍द धर्माच्‍या वतीने भंते रत्‍नमणी,राममचंद्र चंदनखेडे, अनिरूध्‍द आवळे,दिलीप कांबळे,श्रीनिवास कोट्टूर, प्रवीण सोदारी,हेमंत पाझारे,भारत साळवे,भानुदास गंगाधरे,अजय आमटे,निरंजन नगराळे,अरूण साठे, दिलीप कांबळे.ख्रिश्‍चन धर्माच्‍या वतीने बिसप श्‍यामसुंदर नायडू,पास्‍टर आनंद गुंडेटी,वेलाती कलगुर, पास्‍टर प्रभाकर कंडे.मुस्‍लीम धर्माच्‍या वतीने शेख हनीफ,मोहम्‍मद इशहाक,मकसुद भाई,इम्तियाज़ अहमद,रज्जाक शेख,मुज्जू लोहानी,खलील अहमद, मकसुद भाई,शेख मुस्तफा,वसीम भाई,वाहीद अली, हसन शेख,नईम खान,अन्वर खान तर सिख धर्मीयांच्या वतीने जतींदर सिंग दारी,गुरजीत सिंग, गुरपाल सिंग,प्रदीप सिंग,प्रीतम सिंग यांनी महाआरती केली.शिव चौहान यांच्या भजन मंडळाने सु-मधुर भजनाने मंत्रमुग्ध केले.
       महाआरतीच्या यशस्वितेसाठी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,मंडळाचे अध्यक्ष सुनील,सचिव धनराज पारखी,नितुताई चौधरी,चीन्नाजी नलभोगा, निरीक्षण तांड्रा,संजय तिवारी,सिनु इसारप,संतोष नुने, साजन गोहने,रत्नेश सिंग,अमोल थेरे,विवेक तिवारी, राजेश मोरपाका,विनोद चौधरी,बबलू सातपुते,शाम आगदारी,भानेश शेट्टी,प्रमोद सिद्दम,कोमल ठाकरे, हेमंतकुमार,वमशी महाकाली,संकेत बोढे,सचिन कोंडावार,पूजा दुर्गम,किरण बोढे,सुचता लुटे,सुनीता पाटील उपस्थित होते.या महाआरतीला घुग्‍घुस शहरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
Unique message of social unity through interfaith Mahaarti 'Sudhir Mungantiwar'
-------//-------
कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या