कोरपना:-#Korpanalive news.
चंद्रपूर जिल्ह्यात पुर्वी जवळपस 5 वर्षे दारूबंदी होती.एका पालकमंत्र्यांनी दारू बंद केली तर दुसऱ्या पालकमंत्र्यांनी सुरू केली.यामूळे वेळ मर्यादा वाढवून मोठ्या थाटामाटात जिल्ह्यातील परवाना धारक देशी, विदेशी दारू दुकाने सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.असे असताना मात्र ठिकठिकाणी अवैधरीत्या बनावट दारूविक्रीला Illegal sale of counterfeit liquor उधाण आले असून वैध दुकाने सुरू असताना अवैध दारू विक्री होतेच कशी ? अखेर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी "येतो पब्लिक है,सब जानती है."Yeto public hai, sab janati hai.
याच पार्श्वभूमीवर कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतील अंतरगाव(बु)येथे राजरोसपणे मोठ्याप्रमाणावर अवैध दारूविक्री होत असल्याचे कळते.यामुळे विशेषतः महिलांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत आहे.सदर दारूविक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी त्या गावातील ग्रामवासीयांनी केली आहे. यासंदर्भात "युथ इमर्जन्सी सर्व्हिस" Youth Emergency Service अध्यक्ष अमोल कळस्कर यांच्या नेतृत्वात अंतरगाव(बु) येथील महिलांनी थेट कोरपना पोलीस स्टेशन गाठून निवेदन दिले.
वास्तविक पाहता अवैधरीत्या बनावट दारूमुळे गावातील तरूण दारूच्या आहारी जात आहे, गावातील शांतता भंग होवून कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुण्यागोविंदा व सुखाने नांदणारे संसार उद्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.गावातील हे अवैधप्रकार बंद व्हावेत यासाठी ग्रामपंचायततर्फे संबंधित पोलीस स्टेशन,तहसीलदार,जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. मात्र समाधानकारक परिणाम होताना दिसून येत नाही.या अवैध दारू विक्रीला कंटाळून अखेर युथ इमर्जन्सी सर्व्हिस,महिला बचत गट,तंटामुक्ती समिती व गावातील नागरिकांनी एकत्रितपणे कोरपना पोलीस स्टेशनला निवेदन दिले. यावेळी शांताबाई पेटकर,शारदा सूर,वंदना राजूरकर, संगीता धोटे,जनाबाई उपाध्ये,रसीका खोब्रागडे,जोत्स्ना आदे,सीमा गुरनुले,नंदा मोरे गंगुबाई टेकाम आनंदराव मडावी पोलीस पाटील,तं.मु.अध्यक्ष विनोद सूर,ईश्वर खेलूरकर प्रमोदत्र पिंपळशेंडे,अंकीत वडस्कर आदींची उपस्थिती होती.
"या ठिकाणी तर दारूचा महापूर"
कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतील अकोला,पारडी, परसोडा,कातलाबोडी,धानोली,हेटी,कन्हळगाव, बोरगाव,रूपापेठ तसेच कोरपना गडचांदूर मार्गावरील एका बाईकच्या शोरूम समोरील एका धाब्यावर तर गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असून पोलीसांनी याकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे.Police have completely neglected this.तसेच कोरपना शहरात गल्लो गल्लीत सध्या अवैध दारू विक्री होत असल्याची ओरड सुरू आहे. काही दिवसापुर्वी अकोला येथील काही महिलांनी दारूविक्री बंद करणे संदर्भात कोरपना पोलीस स्टेशन येथे मोर्चा सुध्दा आणला होता तरीपण परिस्थिती जैसे थे Such were the conditions आहे.
-------//--------
कोरपनाLive
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली
0 टिप्पण्या