Subscribe Us

header ads

ऐकावे ते नवलच...! It's amazing to hear...!

गडचांदूर:-#Korpanalive news.
     गडचांदूर नगरपरिषदेच्या विविध खात्यातील सर्व सत्ताधारी सभापतींना हक्काची खुर्ची व टेबल मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष भाजपचे BJP नगरसेवक अरविंद डोहे यांनी युद्धपातळीवर धावपळ सुरू केली असून या सभापतींना स्वतंत्र कक्ष तर सोडाच साधी बसण्यासाठी हक्काची जागा,टेबल,खुर्ची There is no right seat,table or chair for the Speaker,let alone a separate room नसल्याने संबंधित सभापतींकडे आपले गाऱ्हाणे व समस्या मांडण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. आरोग्य,स्वच्छता,बांधकाम,महिला व बालकल्याण या समितींच्या सभापतींची निवडणूक फेब्रुवारी 2022 रोजी पार पडली.
   आजघडीला जवळपास 8 महिन्यांचा कालावधी लोटुनही यांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही.हा एका अर्थी यांच्यावर अन्यायच म्हणावे लागेल.नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या हट्टीपणा व नियोजनशुन्य काराभारामुळे गेल्या 14 महिन्यांपासून सफाई कामगार हक्काचे वेतनापासून वंचित आहे हे तर जगजाहिराच,पण यांनी स्वतःच्या सभापतींच्या खुर्च्या व टेबल सुद्धा हटवले,किती शोकांतिका ! असे आरोप नगरसेवक डोहे यांनी केले आहे.सभापतींना कदाचित याची गरज नसावी मात्र जनतेला आहे.या बाबींवर जातीने लक्ष देऊन सर्व सभापतींना किमान स्वतंत्र खुर्च्या,टेबल तसेच नेमप्लेटची व्यवस्था करावी अशी विनंती वजा मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.आता डोहे यांच्या मागणीला यश मिळेल का ? सभापतींना स्वतंत्र खुर्च्या,टेबल मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Opposition corporator's run for chairs, tables of ruling chairman.
It's amazing to hear...!
                      --------//-------
               
               मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या