गडचांदूर:-Gadchandur News.
गडचांदूर येथील अष्टविनायक गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत अंतिम 31ऑगस्ट संपल्यावर ई.के.वाय.सी.EKYC करण्यासाठी वाढीव 9 सप्टेंबर पर्यंतची मुद्दतवाढ देण्यात आली.असे असताना मात्र गडचांदूर परिसरातील सुमारे 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने ते या योजनेपासून वंचित राहणार होते.जिल्हाधीकारी, तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्व शेतकर्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी मंडळाचे सदस्य उद्धव पुरी,सदाशिव गिरी,वैभव गोरे,निखील एकरे यांनी सर्वांची यादी घेऊन प्रत्येकांसोबत दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष घरी जाऊन संपर्क केला व मोफत प्रमाणीकरण पुर्ण करून देण्यात आले.त्यामूळे आता परिसरातील वंचित शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार असल्याने मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा होत आहे.तसेच व्यसनमुक्तीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने पत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली.
मुखरोग,कॅन्सर,सिकलसेल इत्यादी आजारा संदर्भात नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले.परिसर स्वच्छता,अंध श्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती,आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर सुद्धा या 10 दिवसात मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले.तसेच स्वदेशी खेळांबाबत भावी पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने लहान मुला, मुलींना खो-खो,लंगडी,विट्टीदांडू अशा अस्सल मातीच्या खेळांची माहिती देऊन देशी खेळांचे महत्व पटवून देण्यात आले.
अष्टविनायक गणेश मंडळांच्या विविध सामाजिक उपक्रमामुळे या अगोदर 4 वेळा शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे.यावर्षी सुद्धा नामांकन यादीत नाव असल्याने पुरस्कार राशीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय ढेपे यांनी दिली.
--------//--------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज अली.
0 टिप्पण्या