Subscribe Us

header ads

खासदार बाळू धानोरकरांच्या प्रयत्नाला यश. MP Balu Dhanorkar's efforts succeeded.

चंद्रपूर:-#Korpanalive news.
  कोरोना संकटामुळे मागील दोन वर्ष जग थांबले होते. शासनाने संचारबंदी लागू केल्याने 'घरी रहा,सुरक्षित रहा' 'Stay home,stay safe' या सुचनाप्रमाणे लोकांनी घरीच राहणे पसंत केले.मात्र आता बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथील झाल्याने जनजीवन सुरळीत सुरू आहे.याकाळात रेल्वे वाहतुकीवर सुध्दा मोठ्याप्रमाणात परिणाम झाला होता.आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर देखील ती ट्रेन सुरू न झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.ही बाब लक्षात घेऊन खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वे विभागाशी पाठपुरावा करून ट्रेन क्रं.08808 वडसा, चांदा फोर्ट व ट्रेन क्रं.08805 चांदा फोर्ट,गोंदिया 12 डब्यांची मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन Menu Passenger Special Train सुरू केली. 
 ही ट्रेन येत्या 1ऑक्टोबर 2022 रोजी प्रवाशांच्या सेवेत पुन्हा एकदा धावणार आहे.त्यामुळे सदर मार्गावरील ये-जा करणारे लाखो प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण  An atmosphere of happiness among passengers निर्माण झाले आहे.जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नागरिक शेती व इतर व्यवसाय करतात.चंद्रपूर जिल्ह्यातील धान क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच गोंदिया जिल्ह्यात व्यवसाय करणाऱ्यांना सोईचे व्हावे यासाठी चांदा फोर्ट,गोंदीया ट्रेन Chanda Fort, Gondia Train सुरू करण्यात आली होती.यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रवासी देखील ये-जा करीत होते.प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावरील ट्रेनच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या होत्या.लालपरी पेक्षा कमी दरात प्रवास होत असल्याने नागरिक देखील या ट्रेनला पसंती देत होते.ही बाब खासदार बाळू धानोरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वतः पाठपुरावा सुरू केला व त्याची दखल घेत या दोन ट्रेन सुरू झाल्या. जिल्ह्यातील लहाना पासून मोठमोठ्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्याचे काम खासदार बाळू धानोरकर करीत असल्याचे चित्र असून यात त्यांच्या या प्रयत्नाला यश प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून मंडळ रेल उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य राजवीर यादव यांनी खासदार बाळू धानोरकरांचे आभार मानले आहे.
Two trains will run with the efforts of MP 'Balu Dhanorkar'
(MP Balu Dhanorkar's efforts succeeded.)
                      ---------//--------
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या