Subscribe Us

header ads

भारावणारे शहर 'लंडन' आणि बाबासाहेबांची प्रेरणा. The overwhelming city 'London' and the inspiration of Babasaheb.

गडचांदूर:-#Korpanalive news.
लंडन शहर भारावून टाकणारे आहे,एका स्वप्ननगरीत आल्याचा भास होतो,मी पहिल्यांदाच भारताबाहेर आलो आहे,इथे पोहचल्यानंतर मेट्रोने प्रवास करताना  रस्त्याने चालतांना आणि शहरात वावरताना एक बाब विशेष:ने आवडली,ती म्हणजे इथली शिस्त.सिग्नलला वाहने थांबतात तेव्हा 2 वाहनात 2,3 फुटांचे अंतर असते.दुकानात काउंटर समोर एका ओळीने रांगेत ग्राहक उभे असतात.मेट्रो स्टेशनला टुबरेल आली की, आधी ज्या प्रवाशांना खाली उतरायचे त्यांना उतरू दिल्या जाते.त्यानंतर क्रमांक्रमाने कोणतीही धक्काबुक्की न करता अत्यंत शिस्तीने प्रवासी मेट्रोत चढतात.एखादी वयोवृद्ध व्यक्ती उभी दिसली तर लोक स्वत:हून उभे राहून त्यांना जागा देतात.कोणीही कचरापेटी व्यतिरिक्त इतरत्र कचरा फेकताना मला दिसले नाही.लंडनला पुढील वर्षभर माझे वास्तव्य वुड ग्रीन स्टेशन Woodgreen Station लगत आहे. वेळोवेळी येणारे अनुभव तुमच्याशी शेअर करत राहील.
    लंडनला पोहोचल्यानंतर ज्या पहिल्या ऐतिहासिक वास्तूस भेट दिली ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर.कँमडेन भागतील चाल्क फार्म स्टेशन जवळ असलेल्या किंग्ज हेनरी King's Henry मार्गावर लंडन येथे शिकायला असताना बाबासाहेबांचे वास्तव्य होते.1921-22 साली बाबासाहेब तिथे राहिले. 'वेटिंग फार व्हिसा' 'Waiting Far Visa' हे त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर मी प्रचंड रडलो.इतक्या कठीण परिस्थितीत भारतात अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागत असतांना हताश न होता त्यांनी त्याकाळी गाठलेली ही मजल मला नेहमी प्रेरणा देणारी होती व असेल.म्हणूनच लंडनला आल्यानंतर तिथे पहिली भेट देऊन इथला पुढचा प्रवास नव्या ऊर्जेने सुरू केला आहे. 
  बाबासाहेबांच्या लंडन येथील घरी गेल्यानंतर त्यांचा चश्मा,पेन,लिहिलेली पत्रे,महत्वाचे फोटोज बघीतले. लंडन येथून शिकून गेल्यानंतर बाबासाहेबांनी दुर्बल घटकातील काही युवकांना परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले.त्यांच्यासोबतचा बाबासाहेबांचा एक फोटो तिथे दिसला.माझ्या चंद्रपूरचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे Barrister Rajabhau Khobragade साहेब देखील त्या फोटोत आहे. एकंदरित आपल्यासोबत इतरांना पुढे घेऊन जाणारी माणसे समुद्रासारखे प्रवाही,विशाल होतात.अपमान, अवहेलना सहन करून प्रवास सुरू ठेवतात.लंडनला विधी शाखेचे शिक्षण घेऊन वंचित घटकांची कोर्टात प्रभावी बाजू मांडणारे निष्णात अधिवक्ता असलेले बाबासाहेब हे केवळ कोर्टापुर्तेच मर्यादित न राहता लेखणी हातात घेतात.राउंड टेबल conferences, सत्याग्रही आंदोलने व धोरणात्मक कार्य ही करतात. त्यांचे जगणे समकालीन व भावी पिढींना दिशा देऊन जाते.त्याकाळातील महत्वाचे राजकीय नेते व समाजसुधारक Social reformer यांच्यासोबत असलेले फोटोज बघून भारावून गेलो.चालता,बोलता दैदिप्यमान इतिहास डोळ्यासमोर तरंगत होता.जिथे बाबासाहेब वावरले, 'प्रोब्लेम ऑफ इंडियन रूपीज' 'Problem of Indian Rupee' या प्रबंधाचे विचारमंथन केले,ती वास्तू फिरुन झाल्यानंतर जातांना बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.100 वर्षांआधी बाबासाहेब या शहरात आल्यानंतर इथल्या गोडगुलाबी थंड हवेत रमले नाही.हे शहर भुरळ घालणारे,प्रेमात पाडणारे आहे.This city is enticing,enticing लंडन येथील उच्चशिक्षणाचा फायदा भारतातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी व्हावा,म्हणून बाबासाहेब भारतात परतले.ही वाट जरी खाचखडग्यांची आणि संघर्षाची असली तरी बाबासाहेबांची प्रेरणा Babasaheb's inspiration सोबत असल्याने प्रचंड आत्मिक बळ मिळाले आहे.
                 'ॲड.दीपक चटप'(लंडन)
The overwhelming city 'London' and the inspiration of Babasaheb.

This inspiring post by a young man of extraordinary talent.
                     -------//------            

मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या