गडचांदूर:-Gadchandur News.
गडचांदूर येथील वार्ड क्रं.6 तामगाडगे ले-आउट सर्वे नं.7 मध्ये नियमबाह्य नालीचे बांधकाम सुरू असून नकाशात 9 मीटर 30 फुट रूंदीचा रोड असताना काही ठिकाणी 28 फुट तर काही ठिकाणी 26 फुट रूंदीचा रोड Road पहायला मिळत असून अरूंद रस्तयामूळे भविष्यात चारचाकी वाहन चालकांना तसेच वार्डातील नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागणार हे मात्र नक्की.नकाशाप्रमाणे नालीचे बांधकाम करायला पाहिजे होते यासाठी शेतकरी संघटना शहर सरचिटणीस तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पटकोटवार सह वार्डातील इतर नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर नाली बांधकामाकडे स्थानिक लोकप्रतिनिधिंचे लक्ष नाही.यामुळे बांधकाम अभियंतांनी ठेकेदारा सोबत हातमिळवणी करून नाली बांधकामाकडे दूर्लक्ष केले आहे.परिणामी संबंधित ठेकेदार स्वतःच्या मनमर्जीने हलके मटेरियल वापरून निकृष्ठ दर्जाच्या नालीचे बांधकाम करून गैरमार्गाने शासन निधीची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावत आहे.नालीची जाळी शासन नियमापेक्षा पातळ असल्याने नाली लवकर संपूष्टात येण्याची दाट शक्यता असून नियमबाह्य सूरू असल्याचे आरोप करत सदर नाली बांधकामाची तात्काळ चौकशी Construction inquiry करून संबधीत अभियंता व कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संतोष पटकोटवार सह वासुदेव गौरकार,दिलीप आस्वले,सत्तार बेग,विलास बांबोळे,कीशोर वैद्य इतरांनी मुख्याधिकारी Municipal Council Chief यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
-------//------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या