Subscribe Us

header ads

वर्धा पुलावरील ती चित्तथरारक घटना. #Rajura_axident

राजूरा-news Korpanalive:-
'देवतारी त्याला कोण मारी' ही म्हण 6 सप्टेंबर रोजी रात्री अंदाजे 9 च्या सुमारास राजूरा,बामनी मार्गवरील वर्धा नदीच्या पुलावर घडलेल्या त्या चित्तथरारक घटनेमुळे सार्थ ठरली.सविस्तर असे की,त्या रात्री ट्रक आणि पिकअप वाहन वर्धा नदीच्या पुलावर येऊन एकमेकाला ठेपले.ट्रक जागेवरच थांबला मात्र पिकअप नंदीच्या काठावर येऊन नदीत पडता पडता वाचल्याने मोठी दुर्घटना टळली.एखाद्या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या दृश्या प्रमाणे ते पिकअप वाहन अक्षरशः हवेत लटकत असल्याचे थरारक चित्र अनेकांनी प्रत्यक्ष पाहिले.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार महिन्द्रा पिकअप वाहन चंद्रपूर येथे काही इलेक्ट्रिक वस्तूचा माल खाली करून बल्लारपूर मार्गे वर्धा पुलावरून राजूराकडे जात होता. इतक्यात लाकूड भरलेला एक ट्रक विरूद्ध दिशेने येत असताना एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात या पिकअपवर धडकला.या अनपेक्षितपणे घडलेल्या दुर्घटनेत पिकअप वाहन नदीत पडता पडता थोडक्यात वाचले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळ न गमवता तात्काळ पोलीसांनी घटनास्थळ गाठून 5 जणांचे जीव वाचवल्याचे कळते. नशीब बलवत्तर म्हणून हे अशा बिकट व विचीत्र परिस्थितीतून सुखरूप बचावले.
अन्यथा होत्याचे नव्हते झाले असते.या लोकांनी पुर्वी काही सत्कार्य केले असावे जे आज याठिकाणी आड आले,अशी चर्चा ये-जा करणारे प्रत्यक्षदर्शी नागरिक करताना दिसत होते.काही का असेना मात्र 'देव तारी त्याला कोण मारी' असे या निमित्ताने म्हटले तर वावगे ठरणार नाही.ट्रक चालकाने वेळेचे भान ठेवून ओव्हरटेक व घाई न करता व्यवस्थितपणे वाहन चालवण्याची गरज असून जराशी चुक एखाद्याच्या परिवाराला रस्त्यावर आणू शकते असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
                     ---------//--------
'कोरपनाLive'मुख्यसंपादक सै.मूम्ताज़ अली.
               

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या