Subscribe Us

header ads

जिल्हापरिषद शाळे जवळ गुटख्याची विक्री. Sale of Gutkha near Zilla Parishad School.

कोरपना:-#Korpanalive news.
          शाळा,महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम 2003 कायद्यान्वये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध असताना याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे आरोप होत आहे.उदाहरणार्थ कोरपना येथील जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात सर्रासपणे पानटपऱ्या आणि दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची बाब युवा स्वाभिमान पार्टीचे कोरपना तालुकाध्यक्ष मोहब्बत खान यांच्या लक्षात येताच सदर ठिकाणी तंबाखू विक्री बंद करण्याची मागणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे निवेदनातून केली.असे असताना "आम्ही सदरच्या गुटखा विक्रीवर शाळेकडून कुठलीच कारवाई करू शकत नाही" असे खान यांना एका पत्राद्वारे कळवले.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कर्करोगाला आमंत्रण मिळू शकतो.लहान मुलांपासून तर वयोवृद्ध मोठ्याप्रमाणात या पदार्थांचे सेवन करताना सहज दिसून येतात.शाळकरी मुले यांच्या आहारी जाऊ नये यासाठी शासनाने शाळांसह महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पानटपऱ्या आणि दुकानांवर अन्न औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जात आहे.मात्र  अशी कारवाई कोरपना येथे होताना दिसत नाही.सदरची बाब गंभीर असल्याने संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी खान यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हापरिषद चंद्रपुर यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
Sale of Gutkha near Zilla Parishad School.  
                        --------//------                              
                       
                   मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या