कोरपना:-Korpanalive News.
कोरपना तालुका शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी कोरपना तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते,माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले.बसस्थानक पासून सुरू झालेल्या मोर्चाचे तहसील कार्यालय समोर सभेत रुपांतर झाले.याठिकाणी उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केले.
ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा,पूर,अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज,शेत पंपाचे विज बिल माफ करावे,विदर्भ राज्य निर्माण करावे,शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची आर्थिक मदत द्यावी,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराच्या आनुदानाची रक्कम त्वरित द्यावी,वन हक्क कायद्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण नियमित करून पट्टे देताना 3 पिढ्यांची अट रद्द करावी,तात्काळ पट्टे द्यावे,शेतमालावर केंद्र सरकारने लादलेला GST रद्द करावा,विज दरवाढ मागे घ्यावी,शेतकऱ्यांना बाजारपेठ व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे,विरूर व सास्ती येथील शिल्लक राहिलेल्या शेत जमिनी वेकोलीने तात्काळ अधिग्रहीत कराव्या,इतर वन्य प्राण्याप्रमाणे साप चावून भरणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी,शेत पिकात वन्य प्राण्यांचा हैदोस लक्षात घेता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणाचे वाटप करावे,जिवती येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय तातडीने मंजूर करावे,गडचांदूर-आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे, कोरपना येथील क्रीडा संकुलनात आवश्यक ती सोयी सुविधा पुरवावी आदी मागण्यांचे निवेदन Statement तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री CM ना. एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.
शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्यासह ZP जि.प.माजी समाज कल्याण सभापती निलकंठ कोरांगे,शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरूण नवले,तालुकाध्यक्ष बंडू राजूरकर, मदन सातपुते,रमाकांत मालेकर,भास्करराव मुसळे, सुभाष तुरानकर,रत्नाकर चटप,अॕड.श्रीनिवास मुसळे, रवी गोखरे,भास्कर भत्ते,अनंता गोडे,सुरेश राजूरकर, सुदाम राठोड,शब्बीर जहागीरदार,संतोष पटकोटवार, संजय येरमे,प्रभाकर लोडे,सत्यवान आत्राम,मधुकर चिंचोलकर,भाऊजी कन्नाके,गणपत काळे आदींसह मोठ्यासंखेने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन अविनाश मुसळे यांनी केले.
Shetkaryanchya Magnyasathi Tahsil Karyalayaver 'Shetkari Sanghtnecha' Bhavya Morcha.
--------//-------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या