Subscribe Us

header ads

गळफास घेतलेला तो इसम कोण ? #Suicide_news.

गडचांदूर:-#Korpanalive.
   गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील बाखर्डी बस स्टँड जवळील झाडाला गळफास घेतलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर घटना 6 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उजेडात आली असून घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती गडचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीसांनी पंचनामा करून शव,शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.सदर मृत इसम हिरव्या रंगाची टी शर्ट व बरमोडा पॅन्ट घातलेला असून त्याचे वय अंदाजे 50,55 च्या जवळपास आहे.सदर इसम नेमका कोण आणि कुठला ? याची ओळख पटली नसून यासंदर्भात काही माहिती असल्यास पोलीसांना संपर्क करावा असे आवाहन गडचांदूर पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.बातमी लिहिस्तोवर सदर इसमाची ओळख पटली नव्हती,पोलीसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
                    --------//-------
'कोरपनाLive'मुख्यसंपादक,सै.मूम्जाज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या