Subscribe Us

header ads

नगरपरिषदेच्या त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. #Take action against those employees of Nagarparishad.

गडचांदूर#Korpanalive News.
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेची आर्थिक स्थिती फार बिकट असून सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या 14 महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही.कर विभागातील कर्मचारी आपल्या कर्त्यव्यास कसूर करत नागरिकांना विनाकारण व नाहक त्रास देत आहे, नगरपरिषदेची आर्थिक नुकसान करीत आहे,असे आरोप करत सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित दोषी कर्मचाऱ्याविरोधात महाराष्ट्र औद्योगिक नगरी नगरपंचायत,नगरपरिषदा अधिनियम 1965 अंतर्गत 79 कलमान्वये कारवाई करावी अशी मागणी नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे bjp नगरसेवक अरविंद डोहे यांनी न.प.मुख्याधिकारी यांच्याकडे Chief officer Nagarparishad निवेदनाद्वारे केली आहे.
           बाळू बापूजी कोरडे यांचे येथील सर्व्हे क्रमांक 111 अकृषक प्लॉट क्रमांक 44 असून त्या प्लॉटवर घर बांधकाम कलण्यासाठी यांनी 2015 मध्ये नगरपरिषदेची रितसर परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण केले.सध्या ते त्याठिकाणी सहकुटुंब वास्तव्यास आहे. असे असताना अजूनही त्या घरावर टॅक्स लावण्यात आलेला नाही.यासाठी हे वारंवार न.प.चे चकरा मारत असून कर विभाग निव्वळ बनवाबनवी व टाळाटाळ करीत आहे.काही कारणास्तव पैशांची गरज असल्याने त्यांना बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे.परंतू घराचे कागदपत्र व कराची Tax पावती नसल्याने ते मोठ्याप्रमाणात अडचणीत सापडले आहे.
         तसेच सुनील ठाणेकर यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी आपल्या जागेची रजिस्टर वाटणी पत्र करून संपूर्ण कागदपत्रासह फेरफार करण्यासाठी न.प.कडे अर्ज केला.मात्र अजूनही फेरफार झालेला नाही.या कारणाने त्यांचे विविध आवश्यक कामे अडकली आहे. संबंधित विभागाकडून जर वेळेत यासंदर्भात कारवाई झाली असती तर आज यांच्याकडून मोठ्याप्रमाणात टॅक्स नगरपरिषदेला प्राप्त झाला असता मात्र याविषयी काहीच सकारात्मक न घडल्याने न.प.चे आर्थिक नुकसान झाले आहे.अशाप्रकारे आरोप करत न.प.चे आर्थिक नुकसान करणाऱ्या कर विभाग कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक डोहे यांनी केली आहे.जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा प्रशासन अधिकारी न.प.विभाग चंद्रपूर यांनाही निवेदन statement पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.आता यासंदर्भात पुढे काय घडते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
Take action against those employees of Nagarparishad
                 --------//-------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या