Subscribe Us

header ads

मतदार यादी आधार क्रं.जोडणीसाठी विशेष शिबीर. #Voter ID card-Adhar Link.

गडचांदूर:-Korpanalive.
     भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र शासन,विधी व न्याय मंत्रालयाद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा)अधिनियम 2021अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहे.यातील कलम 23 नुसार यादीतील तपशीलाशी जोडण्यासाठी व प्रमाणीकरण करण्यासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधाराची माहिती संग्रहित करण्याबाबत मोहीम राबविण्यात येत आहे.लोकशाही बळकट व सक्षम करण्यासाठी मतदानात प्रत्यक्ष सहभागी व्हावे, मतदार नोंदणी करणे,मतदार यादी अद्यावत करणे, यानंतर आता एक पाऊल पुढे जाऊन आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी जोडणे हे महत्त्वाचे झाले असून नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करून घेणे गरजे आहे.
     याच पार्श्वभूमीवर इतर ठिकाणांसह 70 राजूरा विधानसभा क्षेत्रातील मतदार संघ अंतर्गत राजूरा, कोरपना,जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत (पुर्ण दिवस)संबंधीत सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नागरीकांकडून आधार जोडणी संबंधी नमुना 6 ब अर्ज स्वीकारण्यासाठी नेमूण दिलेल्या केंद्रांवर मतदान केंद्रीय अधिकारी(BLO) उपस्थित राहतील.आधार कार्ड आणि मतदान कार्डाची झेरॉक्स घेऊन जवळच्या मतदान केंद्रावर जावे व आधार जोडणी करण्यासाठी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती वजा आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे.
                       -------//------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या