Subscribe Us

header ads

अचानक दुर्गा पूजा उत्सव समितीची कार्यकारीणी जाहीर. #The working of Achanak Durga Puja Utsav Samiti was announced.

गडचांदूर:-#Korpanalive news.
        नवरात्र महोत्सव 2022 साजरा करण्यासाठी गडचांदूर येथे 'अचानक दुर्गा पूजा उत्सव समिती' ची वार्षिक बैठक स्थायी समिती अध्यक्ष नामदेवराव येरणे,संयोजक हंसराज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाचे वरिष्ठ सदस्य हरिश्चंद्र अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गा माता मंदिरात पार पडली. गेल्या अनेक वर्षापासून कोषाध्यक्ष राहिलेले समितीचे वरिष्ठ सदस्य स्वर्गीय महादेवराव वरभे यांना मंडळातर्फे मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.टिकाराम चिव्हाणे यांनी मागील वर्षाचे जमा खर्च सादर केले. त्यास सर्वानुमते मंजूरी प्रदान करण्यात आली.यावर्षी शासनातर्फे कोरोना निर्बंध Corona restrictions शिथील करण्यात आल्याने आगामी नवरात्र महोत्सव मोठ्या हर्षोल्हास व उत्साहात साजरा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.नवरात्र महोत्सव Navratri festival 2022 साजरा करण्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी प्रतिष्ठित व्यापारी ललित नंदवाणी,कार्याध्यक्ष विवेक येरणे,उपाध्यक्ष प्रशांत पोतनुरवार,सचिव पवन देरकर,सहसचिव लक्की चौधरी,कोषाध्यक्ष आशिष रोकडे,टीकाराम चिव्हाने,महाप्रसाद समिती सदस्यपदी गुलाबराव शेंद्रे, डॉ.दादाजी डाखरे,हेमंत वैरागडे,पाप्पया पोन्नमवार, हरिश्चंद्र अरोरा,अशोक पत्तीवार,लक्ष्मीकांत बाचकवार, विठ्ठलराव कांबळे,सुनील ठाकरे,नरेश साहू,नानाजी गौरशेट्टीवार विसर्जन समिती सदस्यपदी डॉ.विशाल धोटे,सुधीर कोटावार,प्रवीण झाडे रमेश कांबळे,गणेश वनकर,डॉ.निखील डाखरे,अविनाश शेटे,श्रीकांत पानघाटे,इंदर कश्यप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.विविध शासकीय योजना शिबीर,आरोग्य मेळावा,विविध सांस्कृतिक कार्यक्रम,भव्य दांडिया स्पर्धा,दररोज महाप्रसाद वितरण अशा कार्यक्रमांसह 'रावण दहन' Burning Ravana न करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते यावेळी घेण्यात आला. सदर सभेला नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह सुकेश पोतनुरवार,गणेश ठावरी,दिनेश पत्तीवार,ईशांत चौधरी,किशोर धाबेकर,ओम कांबळे,पंडित रत्नेश दुबे यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक व आभार विक्रम येरणे यांनी मानले.#The working of Achanak Durga Puja Utsav Samiti was announced.
                   -------//-------
'कोरपनाLive'मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या