चंद्रपूर:-News of Education.
शैक्षणिक सत्र 2022-23 मधील वर्ग 11 वी च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जुलै महिन्यापासून सुरू झाले. आॕगस्ट महिन्यात पुर्ण व्हायला हवे होते.परंतू अनेक विद्यार्थी 10 वी उत्तीर्ण केल्यानंतर प्रथम प्राधान्य विज्ञान शाखा,आय.टी.आय,नर्सिंग,तंत्र शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेण्याला देत असतात.ज्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळत नाही.अशा विद्यार्थ्यांना दरवर्षीच शिक्षणाधिकारी जि.प.कडून वाढीव प्रवेशाची परवानगी देण्यात येते.Education news.
मात्र यावर्षी शासनाने वाढीव विद्यार्थी संख्येसह तुकडीला मान्यता देण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्यातर्फे 20 विद्यार्थ्यांना तर उपसंचालक शिक्षण विभाग नागपूर यांना 20 विद्यार्थ्यांना प्रवेश मान्यता देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावे असे सुचविले होते.सदर प्रस्तावास शासन मान्यता देण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवले. परंतू 3 महिन्यांचा कालावधी होऊनही शासनाने वाढीव विद्यार्थी पट संख्येला अजूनही मान्यता प्रदान करण्यात आली नाही.त्यामूळे ज्या विद्यार्थ्यांना वर्ग 11 वी साठी ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहे.तेथे प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यामूळे व अजूनही वाढीव पट संख्येला मंजूरी न मिळाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
वाढीव विद्यार्थ्यांना अनेक कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळेल.या आशेने विद्यार्थी प्रवेशित मुलांसोबत वर्गात बसत असून त्यांचे नाव हजेरी पटावर मात्र संख्या मान्यते शिवाय घेता येत नसल्याने वाढीव विद्यार्थी पट संख्येला त्वरित मान्यता प्रदान करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.करीता सदर विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन उपसंचालक शिक्षण विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या वर्ग 11 वी च्या वाढीव विद्यार्थी पट संख्येला मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
Increased student enrollment in 11th should be sanctioned.
MLA Subhash Dhote's request to the School Education Minister.
---------//-------
0 टिप्पण्या