गडचांदूर:-#Korpanalive#Chandrapur #Gadchandur.
नाबार्ड पुरस्कृत साफल्य महिला प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हरदोना खुर्द याची वार्षिक सर्वसाधारण सभा गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी अंबुजा फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे होते तर राजूरा कृषी अधिकारी चेतन चव्हाण,कोरपना कृषी अधिकारी रविंद्र आर.डंभारे,मक्कप्ले सर राजूरा, आडे सर कोरपना,आत्माचे अधिकारी तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन मधून सेडीचे प्राचार्य प्रमोद खडसे, उत्तम कापूसचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रमोद मेश्राम व साफल्य महिला प्रोड्युसर कंपनीचे बॉडी मेंबर यांची प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थिती होती.
याप्रसंगी राजूरा कृषी अधिकारी यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी कृषी विभागाच्या विविध योजनाची सखोल माहिती देत त्या कशा पद्धतीने राबविल्या जातात याविषयी मार्गदर्शन केले.
अंबुजा फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे यांनी येणाऱ्या वर्षात कशा पद्धतीने काम होईल आणि नवीन काय करायचे,याबद्दल माहिती दिली. यावेळी साफल्य महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सदस्यांना शेयरचे सर्टिफिकेट्सचे Shares Certificates वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमात साफल्य महिला प्रोड्युसर कंपनीच्या महिला संचालक मंडळ व सदस्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
------//-------
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या