चंद्रपूर:-#Korpanalivenews #Chandrapur #Gadcgandur.
एकेकाळी केवळ टाईमपास म्हणून खेळला जाणारा ऑनलाईन गेमची Online game आता सवय झाली असून आपल्या देशात ऑनलाईन गेमिंगची 'साथ' आली आहे.भूक,तहान,झोप विसरून 24 तास गेम खेळणारी तरूण पिढी तयार होत आहे.काही ऑनलाईन गेम्समध्ये पैसे कमावण्याची संधी असल्याने जुगाराप्रमाणे त्याचे व्यसन लागत आहे. सध्या राज्यात मोबाईलद्वारे अनेक ऑनलाईन गेमचा सुळसुळाट झाला आहे.या गेमद्वारे सर्रासपणे जुगार खेळला जात असल्याचे निर्दशनास येत असून या जुगाराच्या विळख्यात तरूण पिढी तसेच लहान मुले सुध्दा गुंतलेली आहे.संपूर्ण पिढी देशोधडीला Dēśōdhaḍīlā लागण्याच्या मार्गावर असून यावर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. Demand of MP, MLA Dhanorkar couple to Chief Minister.
हल्ली मोबाईल,टॅब,टिव्हीवर आॕनलाईन गेम्स खेळणं ही अनेकांची सवय झाली आहे.मात्र या सवयीने हळूहळू व्यसनाचे स्वरूप धारण केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.या संपूर्ण ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्न देखील उपस्थीत केला होता.काही दिवसा आधी चंद्रपूर येथील देवाडा गावातील युवकाने ऑनलाईन रमी या खेळाच्या नादातून पत्नीची जीवन यात्रा संपून स्वतः आत्महत्या केली.असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत व हजारो कुटुंबं उध्वस्त होत आहे.तामिलनाडू सकारने अलीकडेच ऑनलाईनच्या सर्व खेळांवर बंदी घातली आहे.बेटिंग आणि जुगारासह ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यासाठी अध्यादेश सुद्धा काढला.ज्याद्वारे जुगार आणि ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात येणार आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के.चंद्रू यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची शिफारस केली होती.तसा अध्यादेश महाराष्ट्र सरकराने काढावा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
#Ban_online_games
#Demand of MP, MLA Dhanorkar couple to Chief Minister.
-------//------
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699
9595630811
0 टिप्पण्या