गडचांदूर:-#Korpanalive news #Chandrapur #Gadchandur.
'रक्तदान जीवन दान' हे मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून तसेच रक्तदान संदर्भात शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत 8 आक्टोंबर रोजी गडचांदूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील रज़ा कॉम्प्लेक्स येथे 'गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-आॕप.सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा गडचांदूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे Blood donation camp आयोजन करण्यात आले.
या शिबिरात जवळपास 50 पेक्षा जास्त महिला,पुरूष रक्त दात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले.बँकेच्या वतीने सर्व रक्तदात्यांचा पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देऊन सत्कार Satkāra करण्यात आला.डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्र चमूने रक्त संकलन blood collection केले.यावेळी बँकेचे महिला, पुरूष कर्मचारी,एजंट व रक्तदाते,नागरिकांची उपस्थिती होती.
Blood Donation Camp by Godavari Urban Parivar.
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ आली.
0 टिप्पण्या