Subscribe Us

header ads

अंदाजपत्रकात लाखोंची वाढ करून न.प.चे नुकसान आणि ठेकेदाराला लाभ ? (नगरसेवक डोहे यांचा आरोप) By increasing the budget by lakhs, loss of N.P. and benefit to the contractor? (Corporator Dohe's Allegation)

गडचांदूर:-#Korpanalive news #Chandrapur #Gadchandur news.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक व नावाजलेले शहर गडचांदूर येथील नगरपरिषद काहीना काही कारणाने हल्ली जनतेसाठी करमणुकीचा विषय ठरत आहे.येथे दररोज वेगवेगळे व अनपेक्षित प्रकरण समोर येत असल्याने "काय ही नगरपरिषद,काय तो अधिकारी, काय ते ठेकेदार,सगळेच एकदम ओक्के" What is the municipal council, what is the officer, what is the contractor, everything is ok अशी उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत असून शेवटी येथे चाललंय तरी काय ! हे न सुटणारे कोडेच बनले आहे.एक प्रकरण थंड व्हायला लागला की लगेच दुसरा तयार ! कधी ग्रीनजिम मध्ये भ्रष्ट्राचार तर कधी ओपनस्पेस सौंदर्यीकरण,रोड,नाली,घनकचरा व्यवस्थापन कामात भ्रष्टाचार.हे कमी होते की काय आता चक्क घनकचरा व्यवस्थापनाचे अंदाजपत्रकातील वाढ प्रकरण समोर आला आहे.या अंदाजपत्रकात हजार दोन हजार नव्हे चक्क 4 लाख 51 हजार रुपये जास्तीची रक्कम टाकून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.असा आरोप accusation येथील विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला आहे.याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई legal action करावी अशी मागणी डोहे यांनी न.प.मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रकरणी सविस्तर असे की,घनकचरा व्यवस्थापन कामात अंदाजपत्रकानुसार घंटागाडी व मनुष्यबळ कमी लावून नाममात्र बिल कपात करून मोठा भ्रष्ट्राचार Big corruption करण्यात आल्याचे आरोप सुरू असतानाच आता घनकचरा व्यवस्थापन Ghanakacarā vyavasthāpana कामात चक्क 4 लाख 51 हजार 190 रूपये जास्तीचे लावून अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची बाब नगरसेवक डोहे यांना RTI च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार समोर आली आहे.यामुळे न.प.ला लाखोंचा वार्षिक आर्थिक नुकसान होत असून निव्वळ ठेकेदाराला लाभ दिला जात असल्याचे आरोप नगरसेवक डोहे यांनी केले आहे.यापूर्वी सुध्दा नगरसेवक डोहे यांनी एका नाली बांधकामाच्या अंदाजपत्रकातील चुक न.प.च्या निदर्शनास आणून दिली होती.त्यामुळे न.प.ला होणारे आर्थिक नुकसान टाळले होते.तत्कालीन मुख्याधिकारी यांनी त्यावेळी न.प.तर्फे नगरसेवक डोहे यांचे अभिनंदन केले होते. Tatkālīna mukhyādhikārī yānnī tyāvēḷī na.Pa.Tarphē nagarasēvaka ḍ'̔ōhē yān̄cē abhinandana kēlē hōtē.आता पुन्हा दुसऱ्यांदा न.प.च्या अंदाजपत्रकातील चूक लक्षात आणून दिली असून याची सत्यता पडताळून चुक आढळल्यास अनावधानाच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने वारंवार चुका करणार्‍या त्या अधिकार्‍यावर मुख्याधिकारी कायदेशीर कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What is the municipal council, what is the officer, what is the contractor, everything is ok!
By increasing the budget by lakhs, loss of N.P. and benefit to the contractor? "Corporator Dohe's Allegation"
                                    ------//------
                                  
                          मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
                                मो.9049358699
                                    9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या