Subscribe Us

header ads

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे.The Chief Minister and Deputy Chief Minister should clarify.

मुंबई:-#Political News.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे.यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या 50 आमदारांनी खोके घेतल्याचा Allegation आरोप होत असल्याचे पहायला मिळत आहे.विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील '50 खोके एकदम ओके' म्हणत टीका करण्यात आली होती.हे प्रकरण शमले नसून बडनेराचे आमदार रवी राणा हे गेल्या अनेक दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर 50 खोके म्हणून टीकेची झोड उठवत आहे.एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणाऱ्या 50 आमदारांमध्ये बच्चू कडू देखील होते.
नुकतेच या टीकेवर आपले मौन सोडत बच्चू कडू यांनी आक्रमकपणे रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे.तसेच 50 खोके प्रकरणात नेमका खरं काय ! याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी खुद्द करावे असे निवेदन बच्चू कडू यांनी दिल्याची माहिती आहे. विरोधकांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले त्यामूळे त्यांचा झालेला जळफळाट मी समजू शकतो. राज्याच्या विकासाची खुंटलेली गती आणि जनादेशाचा आदर करत 50 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले.तेव्हापासून 50 खोके घेतल्याचे आरोप होत आहे.कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून स्टंटबाजी करणाऱ्या रवी राणाकडून माझ्यावर आरोप होत असल्याचे म्हणत बच्चू कडू पुढे म्हणाले की,'सत्तेला लाथ मारणारा माझ्यासारखा स्वाभिमानी व्यक्ती,असले आरोप सहन करणार नाही.म्हणून मी रवी राणा विरोधात पोलिसात तक्रार केली आहे' रवी राणा हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचे जवळचे असल्याचे सांगतात.त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 खोके खरंच आमदारांना दिले का ? हे स्पष्ट करावे.'
     यापूर्वी अनेकदा राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात वाकयुद्ध रंगले.परंतू रवी राणा यांच्या दुटप्पी टीका धोरणामुळे संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना 50 खोके प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याचे भावनिक आवाहन केले आहे.येत्या काळात या मोठ्या नेत्यांकडून रवी राणा यांना समज मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाऊन थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Chief Minister and Deputy Chief Minister should clarify.
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या