गडचांदूर:-Free animal news. #Korpanalivenews.
कोरपना तालुक्यातील नावाजलेले शहर गडचांदूर येथील मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा हैदोस पहायला मिळत असून याच्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.अपघाताची शक्यता बळावली असतानाच स्थानिक नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केल्याचे आरोप होत आहे.सदर समस्या त्वरीत मार्गी लावुन रस्ता मोकळा करावा अन्यथा भविष्य या जनावरांमुळे अपघात घडल्यास मुख्याधिकारी आणि नगरपरिषद जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट मत संतोष पटकोटवार यांनी नगरपरिषदेत दिलेल्या निवेदनातून व्यक्त केला आहे. Gaḍacāndūrātīla mukhya mārgāvara mōkāṭa janāvarān̄cā haidōsa. Vāhatukīsa aḍathaḷā.
शहरातील मोकाट जनावरांनी याठिकाणी अक्षरशः बस्तान मांडल्याचे चित्र पहायला मिळत असून वाटसरूंना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अगोदरच शहरातील सैराट बाईक स्वारांमुळे लोकांना विशेषतः लहान मुलांना जीवमुठीत घेऊन रस्त्यावरून वाटचाल करावी लागत आहे.आशातच मोकाट जनावरांची समस्या ! डोकेदुखी बनली आहे.सदर रस्त्यावर सैरावैरा फिरत असलेले आणि काही ठिकाणी बस्तान मांडलेली ही मोकाट जनावरे वाहन जवळ आल्यावर सुद्धा जागेवरून हटत नाही. शेवटी नाईलाजाने चालकालाच काठीने बाजूला करावे लागत आहे.
याठिकाणी जनावरांचा कळप पाहुन हा 'राष्ट्रीय महामार्ग आहे की,शहरातील एखादी संकुचित गल्ली' असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अगोदरच या रस्त्याची रूंदी कमी,त्यावर दोन्ही बाजूला दिवसभर उभी असलेली लहान-मोठी वाहने तसेच बसस्थानक परिसरात खाजगी प्रवासी वाहनांची रेलचेल.यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे जिकरीचे ठरत आहे.

या मोकाट जनावरांमूळे एखाद्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले तर मोठा अपघात होऊ शकतो,जीवित हानी होऊ शकते व मोठे नुकसान होऊ शकते.या समस्यांचे निवारणासाठी शहरातील लोकप्रतिनीधींना तोंडी सवरूपात सांगितले मात्र ती मंडळी याकडे लक्ष देत नसल्याने आपण या शहराचे मुख्याधकारी असून आपल्या हातात यंत्रणा आहे. करीता मुख्यमार्गावर सैरावैरा मोकाट फिरणार्या जनावरांचा तातकाळ बंदोबस्त करावा.जर यांच्यामूळे भविष्यात अपघात होऊन कुणी दगावला किंवा नुकसान झाल्यस याला आपण जबाबदार असाल असे पटकोटवार यांनी नगरपरिषदेतला दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
CO and NP responsible for accidents caused by loose animals.
Gaḍacāndūrātīla mukhya mārgāvara mōkāṭa janāvarān̄cā haidōsa.Vāhatukīsa aḍathaḷā.
--------//-------
0 टिप्पण्या