Subscribe Us

header ads

'वाचन प्रेरणा दिन' डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी. Dr.A.P.J.Abdul Kalam Jayanti Celebration at Sa.Ba.Phule Vidyalaya.

गडचांदूर:-#Dr.Kalam Jayanti. #Korpanalivenews.
    सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी शाळेचे प्राचार्य धर्मराज काळे,पर्यवेक्षक संजय गाडगे,ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीचे जतन करण्याच्या अनुषंगाने त्यांचा जन्मदिन हा "वाचन प्रेरणा दिन" Reading Inspiration Day म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा उपक्रम घेण्यात आले.मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व समजून वाचन करण्याचे आवाहन केले.कलाम यांना मिसाईल मॅन Misā'īla mĕna याची उपाधी का बरं देण्यात आली,याविषयी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.

        याप्रसंगी शाळेच्या सेवाजेष्ठ शिक्षिका ज्योती चेक मॅडम यांनी पुस्तकाचे व वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.वाचन केल्याने मन,मस्तक व मेंदू मजबूत होतो असे विचार व्यक्त केले.तसेच 15 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक हात धुणे दिवस Hand washing day म्हणून पण साजरा केला जातो.याचे महत्व बोबडे सर यांनी विद्यार्थ्यांना पटवून देत त्याचे फायदे विशद केले व हात धुणे प्रकल्प शाळेत राबविण्यात आला.संचालन कु.ज्योती चटप मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार भालचंद्र कोंगरे यांनी मानले.कार्यक्रमाला शाळेतील सर्व,शिक्षक, शिक्षिका वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Reading Inspiration Day.
Misā'īla mĕna.
Dr.A.P.J.Abdul Kalam Jayanti Celebration at Sa.Ba.Phule Vidyalaya.
                                   ------//------
                        
                         मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या