Subscribe Us

header ads

वृद्धाश्रमासाठी पहिला प्रयोग चित्रपट "हद्द एक मर्यादा." The first experimental film for the old age home is "Limits and Limits."

चंद्रपूर:-#Korpanalivenews #Chandrapur #Gadchandur.
     चंद्रपूरातील काही कर्तबगार फोटोग्राफर युवकांनी आपापले व्यवसाय सांभाळून एका नवीन क्षेत्रात पाऊल टाकत काही नवीन करण्याच्या उद्देशाने चित्रपट निर्मिती केली आहे.ज्याचे नाव आहे 'हद्द'एक मर्यादा.यामध्ये पुणे, मुंबई अशा मोठमोठ्या शहरातील व मोठमोठ्या चित्रपटात गाजलेले कलावंत नसून आपल्याच कर्मभूमीतील स्थानिक युवकांना घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे.एक सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटाचा पहिला प्रयोग येत्या 15 ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृह येथे सायंकाळी 4.30, रात्री 7 व 9 वाजता अशाप्रकारे फक्त 3 शो मध्ये डिवू सावली वृद्धाश्रम चंद्रपूर यांच्यासाठी चॅरिटी शो म्हणून असणार आहे. यातील अर्धा वाटा वृद्धाश्रमाला जाणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे. 
चंद्रपूरातील दोन ध्ययवेड्या तरूणांनी गमतीने पहिली मराठी चित्रपट निर्मीती सुरू केली व पाहतापाहता अनेकजण जुळत गेले आणि स्वप्न वास्तवात उतरले यामुळे सर्व आनंदाने बेभान झाले.हे दोन युवक म्हणजे देवा बुरडकर व प्रितम खोब्रागडे हे असून यांनी 'हद्द' एक मर्यादा,या चित्रपटाच्या निर्मीतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले.'हद्द' चित्रपट हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट असून या चित्रपट निर्मितीचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील सर्व कलावंतांनी मानधनाचीही अपेक्षा ठेवली नाही.कारण 1,2 सोडले तर बाकीचे कलावंत नवोदित आहे.असे असताना त्यांचा अभिनय मात्र अप्रतिम आहे
  सदर चित्रपटाची निर्मिती 2019 पासून झाली आणि चित्रपटाचे चित्रीकरण 90 टक्के झाल्यावर ट्रेलर तयार करून 20 जानेवारी 2020 रोजी सिद्धार्थ प्रिमीअर हॉटेलमध्ये या ट्रेलरचा शानदार लोकार्पण सोहळा पार पडला.तत्काकालीन पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, आमदार किशोर जोरगेवार,माजी महापौर सौ.राखी कंचर्लावार,राहुल पावडे,ब्रिजभुषण पाझारे यांनी उपस्थिती दर्शवून चित्रपटाचे कौतुक करत भरभरून आशिर्वाद व अभिनंदन केले होते.नेमका त्याच वर्षी मार्च महिन्यानंतर प्रथमच कोरोना नामक जागतिक महामारी पसरली आणि संचारबंदी(लॉकडाउन) लागले.परिणामी चित्रपट थंड बस्त्यात गेला.
आता मात्र प्रतिक्षा संपली असून सदर चित्रपट हा चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी समस्या "मानव,वाघ संघर्ष" हा विषय घेऊन समाज वनविभाग,पोलीस समन्वय अशा आशयाचे भाषण करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे."एस.के.चित्रपट निर्मिती चंद्रपूर" 'हद्द' एक मर्यादा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून सदर चित्रपटाद्वारे मानव,वाघ संघर्ष रोखण्याचे उपाय व संदेश देण्यात आला आहे.चित्रपटाच्या माध्यमातून मिळणारी निधी वस्तू स्वरूपात अनाथालय व वृद्धाश्रमाला दान म्हणून देण्यात येणार असल्याचे कळते.या सेवाभावी कार्यासाठी चित्रपट बघावा अशी विनंती चित्रपट दिग्दर्शकांनी केली आहे.
The first experimental film for the old age home is "Limits and Limits."
                                    -------//-------
                             
                         मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या